Bigg Boss Marathi 6 Grand Finale Twist: ज्या दिवसाची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस अखेर जवळ आला. आज बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनचा (Bigg Boss Marathi) ग्रँड फिनाले आहे. 17 स्पर्धकांमध्ये सुरू झालेला प्रवास अखेर टॉप 5 स्पर्धकांपर्यंत पोहोचला आहे. आज बिग बॉसची ट्रॉफी घरी कोण घेऊन जाणार? याकडे प्रेक्षक तसेच चाहत्यांचं लक्ष आहे. टॉप 5च्या लिस्टमध्ये तन्वी कोलते, राकेश बापट (Rakesh Bapat), दिपाली सय्यद, अनुश्री माने आणि विशाल कोटियन या स्पर्धकांचा समावेश आहे. टॉप 5 स्पर्धकांमधून (Entertainment) कोणता स्पर्धक घरी ट्रॉफी घेऊन जाणार? त्या विजेत्या स्पर्धकाचं नाव आज उघड होईल. ग्रँड फिनाले पाहण्यासाठी सध्या प्रेक्षक आतुर आहे. दरम्यान, ग्रँड फिनाले होण्यापूर्वी पहिलं एव्हिक्शन झालं आहे. याचा प्रोमोही समोर आला आहे. प्रोमो समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
बजर दाबून स्वत: एलिमिनेट करणाऱ्या स्पर्धकाला मिळणार 5 लाख (Bigg Boss Marathi Season 6 grand finale)
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनचा ग्रँड फिनालेचा प्रोमो कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजनं शेअर केला आहे. प्रोमोमध्ये होस्ट रितेश देशमुखच्या हातात एक बॅग दिसत आहे. ही छोटी बॅग दाखवून रितेश देशमुख टॉप 5 स्पर्धकांना एक ऑफर देतो. 'जो स्पर्धक बजर दाबेल आणि स्वत:ला एलिमिनेट करेल, त्याला ५ लाख रुपये देण्यात येईल', असं रितेश देशमुख स्पर्धकांना सांगतो. टॉप 5 स्पर्धक एका लाइनमध्ये उभे असतात. त्यांच्यासमोर बजर असतो. यानंतर राकेश बापट पुढे येत असल्याचं पाहायला मिळतं.
राकेश बापट एलिमिनेट होणार? (Rakesh Bapat self eviction in bigg boss marathi)
राकेश बजर दाबण्यासाठी पुढे जातो. स्पर्धक तसेच इतर एलिमिनेट झालेल्या स्पर्धकांना धक्का बसतो. राकेश खरंच बजर दाबणार का? राकेश एलिमिनेट होणार का? हे फिनाले एपिसोडमध्ये स्पष्ट होईल. दरम्यान, बिग बॉसच्या घरातून राकेश एलिमिनेट झाल्याची चर्चा आहे. तन्वीनंतर राकेश बापटचं नाव विनर म्हणून चर्चेत होतं. राखी सावंत देखील खास राकेश बापटला व्होट करा म्हणून जनता आणि स्पर्धकांना आवाहन करत आहे. परंतु, बजर दाबून राकेश स्वत:ला एलिमिनेट करणार का? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
