Ajay Devgan On Raja Shivaji Movie: रितेश देशमुख लिखित आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' चित्रपटाची सध्या एकच चर्चा आहे. या चित्रपटासाठी बहुआयामी आणि दिग्गज कलाकारांची फळी एकत्र येत आहे. हा भव्य ऐतिहासिक चित्रपट 1  मे 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर समोर येताच सोशल मिडीयावर तसेच मनोरंजन विश्वातून अनेकांच्या मनात या चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झालंय. अनेक कलाकार या चित्रपटाला शुभेच्छा देताना दिसतायत. दरम्यान,  'तान्हाजी: द अनसंग' या चित्रपटातून मराठ्यांची शौर्यगाथा समोर आणणाऱ्या  बॉलीवूड अभिनेता अजय देवगण यानेही 'राजा शिवाजी' चित्रपटाची झलक पाहून 'तान्ह्याचा मुजरा राजे' म्हणत रितेश आणि त्याच्या टीमला शुभेच्छा दिल्यात. भारतीय इतिहासाचा गौरव, त्यातील भावगर्भता आणि भव्यता यांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एका प्रेरणादायी प्रवासावर घेऊन जाणार आहे.

Continues below advertisement

अजय देवगणचा 'राजा शिवाजी'ला मानाचा मुजरा

अजय देवगण याने सोशल मिडीयावर राजा शिवाजी चित्रपटाचं फोटो शेअर करत या चित्रपटाच्या भव्यतेचे कौतुक केले आहे. त्याने लिहिले," तान्ह्याचं नमन राजे, हे खूप अद्भूत दिसतंय" तुम्हाला फक्त यश आणि कीर्तीच लाभो, अशी शुभेच्छा!" असं म्हणत अजय देवगणने राजा शिवाजी चित्रपटाच्या टीमला आणि रितेश देशमुखला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Continues below advertisement

अजयच्या या कमेंटची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगलीय. तान्हाजीकडून शिवरायांना मनाचा मुजरा केल्याचं म्हणत प्रेक्षक या कमेंटवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. शिवाय यापूर्वी छावा चित्रपटात छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशलनेही या चित्रपटाला ' आबासाहेब' असं म्हणत आपला सपोर्ट केलं होता. 

तगडी स्टारकास्ट, कधी होणार रिलीज?

रितेश विलासराव देशमुख लिखित व दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात दिग्गज आणि बहुआयामी कलाकारांची फळी एकत्र आली आहे. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांचा समावेश आहे. 

'जिओ स्टुडिओज' प्रस्तुत आणि 'मुंबई फिल्म कंपनी' निर्मित, ज्योती देशपांडे व जिनिलिया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय इतिहासाचा गौरव, त्यातील भावगर्भता आणि भव्यता यांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एका प्रेरणादायी प्रवासावर घेऊन जाणार आहे.