Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : अभिनेत्री वर्षा उसगांवकर, गायक अभिजीत सावंतसह कोकण हार्टेड गर्ल; बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांची यादी पाहा

Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : बिग बॉस मराठीसाठी अवघ्या काही तासांची प्रतीक्षा उरली आहे. घरात कोणते कलाकार सहभागी होणार याची देखील उत्सुकता लागून राहिली आहे.

जयदीप मेढे Last Updated: 28 Jul 2024 11:24 PM
Bigg Boss Marathi Season 5 Contestant List : बिग बॉस मराठीच्या घरात दाखल झालेल्या स्पर्धकांची संपूर्ण यादी

छोटा पुढारी, कोकण हार्टेड गर्ल, वर्षा उसगावकर ते इराना रुडाकोवा, मराठी बिग बॉसच्या घरातील नावे अखेर समोर


वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर 


 


 


 


 

Suraj Chavan Bigg Boss Marathi 5 : टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरात

Bigg Boss Marathi 5 : टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरात सगळ्यांना गुलीगत चीत करायला दाखल झाला आहे.





Dhananjay Powar : रील स्टार धनंजय पोवार बिग बॉस मराठीच्या घरात

Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : उद्योजक ते फेमस रील स्टार असा प्रवास करणारा कोल्हापुरी गडी, धनंजय पोवार येतोय बिग बॉस मराठीच्या घरात करायला धमाल





Rapper Arya in Bigg Boss Marathi 5 : आर्याचा hustle ठरणार सगळ्यांवर भारी

Bigg Boss Marathi 5 : मराठमोळी रॅपर आर्या जाधव हिने बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेतली आहे. 





Abhijeet Sawant Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : बिग बॉसच्या घरात सुरांचा बादशाह, गाण्यांप्रमाणे खेळातलाही सूर अभिजीत सावंतला गवसणार?

Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : इंडियन आयडलचा पहिला सिझन जिंकणारा मराठमोळा गायक अभिजीत सावंतने (Abhijeet Sawant) बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. बिग बॉस मराठीकडून (Bigg Boss Marathi Season 5) शेअर करण्यात आलेल्या एका प्रोमोनंतर अभिजीतच्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली होती. पण आता त्याच्या एन्ट्रीने या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : अरबाज पटेल आणि वैभव चव्हाण यांची बिग बॉस मराठीच्या घरात

Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : अरबाज पटेल आणि वैभव चव्हाण यांची बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल झाले आहेत.





Nikki Tamboli in Bigg Boss Marathi 5 : निक्की तांबोळीच्या दिलखेच अदा करतायेत सगळ्यांना घायाळ

Nikki Tamboli in Bigg Boss Marathi 5 : अभिनेत्री निक्की तांबोळी बिग बॉस मराठीच्या घरात दाखल झाली आहे.


 





Irina Rudakova : परदेसी गर्ल इरिना रूडाकोवा करतेय इंटरनॅशनल स्टाईलने कल्ला!

Irina Rudakova : बिग बॉस मराठीच्या घरात परदेसी गर्ल इरिना रूडाकोवा हिने एन्ट्री घेतली आहे.





Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : छोटा पुढारी घन:श्याम दरवडे यांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : रोखठोक बोलणार, भल्याभल्यांची पोल खोलणार, छोटे पुढारी घन:श्याम दरवडे


 






 

Varsha Usgaonkar : नाही नाही म्हणत वर्षा उसगांवकरांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

Varsha Usgaonkar : बिग बॉस मी आले...! नाही नाही म्हणत वर्षा उसगांवकरांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केलीच


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Abhijeet Sawant in Bigg Boss Marathi : सूरांचा राजा अभिजीत सावंत बिग बॉसच्या घरात

Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : आपल्या गाण्यांनी संपूर्ण तरुणाईला वेड लावणारा पहिला Indian Idol, अभिजित सावंत बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.






 

Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : बिग बॉस मराठीच्या घरात योगिता चव्हाणची रिक्षा सुसाट सुटणार

Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : बिग बॉस मराठीच्या घरात योगिता चव्हाणची रिक्षा सुसाट सुटणार


 





Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : छोट्या पडद्यावरील 'खलनायक' जान्हवी किल्लेकर बिग बॉसच्या घरात

Bigg Boss Marathi Season 5 Live Updates :  छोट्या पडद्यावरील 'खलनायक' जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक बनून आली आहेत.


 





Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : हास्यसम्राट पॅडीचं बिग बॉस मराठीच्या घरात स्वागत

Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : बिग बॉस मराठीच्या घरात कॉमेडी वीर पंढरीनाथ उर्फ पॅडीची एन्ट्री झाली आहे.





Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : कोकण आणि पुण्याचा वाद कायमचा मिटवायला येतायेत अंकिता आणि निखिल

Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि अभिनेता निखिल दामले यांची बिग बॉसच्या घरात ग्रँड एन्ट्री





Bigg Boss Marathi 5 First Contestant : बिग बॉस मराठीच्या घरात निखिल दामले स्पर्धक म्हणून दाखल

Bigg Boss Marathi 5 First Contestant : बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेता निखिल दामले स्पर्धक म्हणून दाखल झाला आहे.

Bigg Boss Marathi 5 First Contestant : बिग बॉसच्या घरात कोकण हार्टेड गर्लची एन्ट्री

Bigg Boss Marathi 5 First Contestant : बिग बॉसच्या घरात कोकण हार्टेड गर्लची एन्ट्री झाली आहे.

Bigg Boss Marathi 5 First Contestant : वर्षा उसगांवकर बिग बॉस मराठीच्या पहिल्या स्पर्धक

Bigg Boss Marathi 5 First Contestant : बिग बॉस मराठीच्या पहिल्या स्पर्धक वर्षा उसगांवकर आहेत.

Bigg Boss Marathi 5 Live First Contestant : वर्षा उसगांवकर बिग बॉस मराठीच्या पहिल्या स्पर्धक

Bigg Boss Marathi 5 First Contestant : बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या स्पर्धकाची एन्ट्री झाली आहे. वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठीच्या पहिल्या स्पर्धक आहेत.

Bigg Boss Marathi 5 live updates : बिग बॉस मराठीच्या घराची पहिली झलक

Bigg Boss Marathi 5 House First Look : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या घराची पहिली झलक समोर आली आहे.


 





Bigg Boss Marathi Season 5 Live : बिग बॉस मराठीच्या ग्रँड प्रीमियरला रितेशची लयभारी स्टाईलने सुरुवात

Bigg Boss Marathi Season 5 Live : बिग बॉस मराठी सीझन 5 या नवीन पर्वाला सुरुवात झाली आहे.

Bigg Boss Marathi Season 5 live updates : अवघ्या काही तासांची प्रतीक्षा, रितेश देशमुख करणार बिग बॉसच्या स्पर्धकांचं ग्रँड वेलकम!

Bigg Boss Marathi Season 5 live updates :  बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनच्या ग्रँड प्रिमिअर आता काही मिनिटांतच सुरुवात होणार आहे. त्यामुळे घरात कोणते स्पर्धक जाणार याची उत्सुकता आता संपणार आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 live updates : नवी थीम, नवा सिझन; बिग बॉसच्या चक्रव्यूहात कोण कोण अडकणार?

Bigg Boss Marathi Season 5 live updates : बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन आता अवघ्या काही तासांमध्ये सुरु होणार आहे. यंदाची बिग बॉसची थीम ही चक्रव्यूह अशी आहे. त्यामुळे या चक्रव्यूहात कोण अडकणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 live updates : बिग बॉसच्या घरात Desi Boyzची एन्ट्री, कोण असणार राडा घालायला सज्ज असणारे पुढचे स्पर्धक?

Bigg Boss Marathi Season 5 live updates : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi Season 5 ) ग्रँड प्रिमिअर उद्या म्हणजेच 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी स्पर्धकांचे नॉन रिव्हिलिंग प्रोमो सध्या कलर्स मराठीकडून शेअर करण्यात येत आहे. त्यामुळे घरात नक्की कोण कोण जाणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. मागील दोन प्रोमोमधून परदेसी गर्ल आणि गायक अभिजीत सावंतच्या नावाची चर्चा रंगली होती. आता पुन्हा एक प्रोमो शेअर करण्यात आला असून Desi Boyzची एन्ट्री होणार आहे.  





Bigg Boss Marathi Season 5 live updates : 50 दिवस 250 कामगार, यंदा सगळे चक्रव्यूहात अडकणार; बिग बॉसच्या घराची सफर 'माझा'वर

 Bigg Boss Marathi Season 5 live updates :   बिग बॉसच्या घरात आता लवकरच राडा सुरु होणार असून अवघ्या काही तासांची प्रतीक्षा उरली आहे. त्याआधी बिग बॉसच्या घराची झलक माझावर दाखवण्यात आली आहे. 


Bigg Boss Marathi Season 5 : हिंदीनंतर आता बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री करणार 'ही' बोल्ड अभिनेत्री?

Bigg Boss Marathi Season 5 :  बिग बॉसच्या घरात डान्सिंग क्विन सहभागी होणार असून नव्या प्रोमोमुळे या अभिनेत्रीच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. या प्रोमोवरुन ही डान्सिंग क्विन निक्की तांबोळी असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. नेटकऱ्यांनी त्या प्रोमोमध्ये निक्कीला टॅग केलं आहे. त्यामुळे निक्की खरंच बिग बॉसच्या घरात सहभागी होणार का? हे येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. नाच मेरी रानी या गाण्यावर ही स्पर्धक थिरकताना दिसत आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घराची पहिली झलक

Bigg Boss Marathi Season 5 : कसं आहे बिग बॉस मराठीचे घर? पहिली झलक माझावर! फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पार्श्वभूमी

Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला बिग बॉस मराठीच्या पाचव्या (Bigg Boss Marathi Season 5) सिझनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आज म्हणजेच 28 जुलै रोजी हा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर रात्री 9 वाजता बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रिमिअर होणार आहे. त्यामुळे घरात कोण कोण जाणार हे आता अवघ्या काही तासांमध्ये समोर येईल. 


बिग बॉसच्या सिझनची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. त्यातच पहिल्यात प्रोमोमध्ये प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज मिळालं. यंदा बिग बॉसच्या होस्टच्या खुर्चीत रितेश देशमुख बसणार आहे. त्यामुळे तो त्याच्या स्टाईलने घरातल्या स्पर्धकांची शाळा घेणार आहे. अनेक दिवसांपासून या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 


हे स्पर्धक होणार सहभागी? 


बिग बॉसकडून काही स्पर्धकांचे नॉन रिव्हिल प्रोमो देखील शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये गायक अभिजीत सावंत याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्याचप्रमाणे एका परदेसी गर्लचा देखील प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे ही परदेसी गर्ल कोण असणार याची देखील उत्सुकता लागून राहिली आहे. अभिनेता शुभंकर तावडे देखील बिग बॉसच्या घरात सहभागी होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. कारण शुभंकरच्या सोशल मीडिया पोस्टवरुन तो घरात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच सोशल मीडिया स्टार अंकिता वालावलकर हिच्या देखील नावाची जोरदार चर्चा आहे. 


रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार


काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार असल्याचं स्पष्ट झालं. अशातच आता पुन्हा एकदा नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख यंदाचा सीझन वाजवायला सज्ज आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.