Bigg Boss Marathi 6: कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या 'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये राकेश आणि रुचिता यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसत आहे. या भांडणामुळे घराचे वातावरण पूर्णपणे तापले असून, इतर स्पर्धकांनाही मध्यस्थी करणे कठीण झाले आहे. (Rakesh Ruchita Clash)

Continues below advertisement

नेमकं घडलं तरी काय?

प्रोमोमध्ये दिसल्याप्रमाणे, एका टास्कदरम्यान किंवा चर्चेदरम्यान राकेश आणि रुचिता यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. या वादाचे रूपांतर बघता बघता मोठ्या भांडणात झाले. राकेशचे बोलणे आणि त्याला चोख प्रत्युत्तर देणारी रुचिता यामुळे घरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दोघांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. दोघांमधील संवाद इतका टोकाला गेला आहे की, घरातील इतर सदस्यही यात ओढले गेले. या वादामुळे घरातील समीकरणं बदलण्याची शक्यता असून, सदस्य कुणाची बाजू घेणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. या राड्यामुळे बिग बॉस काही कठोर पाऊल उचलणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. हा राडा नेमका कशामुळे झाला आणि याचे पडसाद घरामध्ये कसे उमटणार, हे आज कळेलच.

राकेश आणि रुचिता भिडले!

या वादादरम्यान रुचिता राकेशला उद्देशून, “खेळायचं असेल तर खेळ, नाहीतर घरी जा,” असा थेट इशारा देते. यावर राकेश चिडून प्रतिक्रिया देतो. वाद वाढत असतानाच रुचिता राकेशच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित करते. या दरम्यान अनुश्री देखील मध्ये पडत रुचिताला प्रश्न विचारते की, ती स्वतःच का बोलत आहे. इतर काही सदस्यही राकेशवर टीका करताना दिसतात आणि त्याला ‘नाटकी’ असल्याचं म्हणतात. या सगळ्या गोंधळात राकेश संतापाच्या भरात म्हणतो, “चूप बैस! ही राहील किंवा मी राहील या घरात… दॅट्स इट!” राकेशचं हे विधान घरातील वातावरण अधिकच तापलेलं दिसतं.

Continues below advertisement

या हाय-व्होल्टेज ड्रामामुळे घरातील समीकरणं पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. कोण कुणाच्या बाजूने उभं राहणार, बिग बॉस या वादावर काही कठोर निर्णय घेणार का, आणि या भांडणाचे पडसाद पुढील खेळावर कसे उमटणार हे सगळं आजच्या भागात स्पष्ट होणार आहे.