Gold Silver Rate Today: गेल्या चार-पाच दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दारात मोठे चढउतार होताना दिसत आहेत. सोमवारी रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेला आयात कर कमी केल्याची घोषणा केल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली.  गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली सोन्या चांदीच्या किमतींमधील घसरण अखेर थांबली आहे. (Gold Rates) आज सोन्याच्या किमतीत 3 टक्क्यांहून अधिक तर चांदीच्या किमतींमध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Continues below advertisement

Gold Silver Rates: सोन्या-चांदीचे ताजे दर किती?

बुलियनस असोसिएशनच्या ताज्या आकडेवारीनुसार, काल 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1 लाख 53 हजार 820 रुपये होता. तो आज एक लाख 59 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. म्हणजेच गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 5820 रुपयांची वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅम मागील दर हा एक लाख 46 हजार 346 रुपये आहे. 

दुसरीकडे चांदीचा दर हा 24 तासांपूर्वी 2 लाख 67 हजार 890 होता. आज हा दर 2 लाख 78 हजार 170 रुपये झाला आहे. म्हणजेच चांदीच्या दरात गेल्या 24 तासात  दहा हजार 280 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. 

Continues below advertisement

सोन्या-चांदीचे दर पुन्हा विक्रमी उच्चांकावर जाणार? 

चार दिवसांपूर्वी 1 लाख 80 हजारांवर असलेले सोने 1,45,000  पर्यंत खाली आलं होतं. , तर 4 लाखांवर असलेली चांदी 2 लाख  50 हजारांपर्यंत गडगडली होती. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसले मात्र दुसरीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या चांदीकडे पाहिले जाणाऱ्या गुंतवणूकदारांचे  मात्र धाबे दणाणले होते. गेल्या 24 तासात पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली असून काल 152000 रुपयावर असलेले सोने आज 159000 वर जाऊन पोहोचले आहे.  चांदीच्या दरातही तब्बल 37000 हजार रुपयांची वाढ होऊन 287000  वर दर पोहोचलेत. पुढील काळात सोने आणि चांदीचे दर हे पुन्हा एकदा विक्रमी उंचीवर जाण्याचे संकेत सुवर्ण व्यावसायिकांनी दिले आहेत. (Jalgaon Gold Market)

जागतिक पातळीवर रुपया वधारला आहे. पण त्याबरोबरच डॉलर वरचा कमी झालेला विश्वास ,यामुळे अनेक देशांनी सोने आणि चांदीत गुंतवणूक केल्याचा हा परिणाम मानला जात आहे. आज जरी सोने चांदीच्या किमतींमध्ये वाढ दिसत असली तरी मागील काळात झालेल्या दर वाढीच्या तुलनेत ती कमीच आहेत. कमी झालेल्या दराचा फायदा घेण्यासाठी, अनेक ग्राहक हे सोने खरेदीसाठी जळगावच्या सराफा बाजारात गर्दी करताना पाहायला मिळत आहे.