Chandrapur Municipal Corporation चंद्रपूर : काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे भाजपचा महापौर (Chandrapur Mayor) झाल्यास आमची आघाडी तोडू, असाइशारा चंद्रपूर महापालिकेत (Chandrapur Municipal Corporation) काँग्रेसची निवडणूक पूर्व आघाडी असलेल्या जनविकास सेनेचे प्रमुख पप्पू देशमुख यांनी काँग्रेसला (Chandrapur Congress) दिलाआहे. जनविकास सेनेचे 3 नगरसेवक आहेत. तर 66 सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महापालिकेत 34 हा बहुमताचा आकडा जुळवताना प्रमुख राजकीय पक्षांच्या नाकीनऊ येत आहे. एक- एक नगरसेवक महत्त्वाचा ठरत असताना काँग्रेसशी निवडणूक पूर्व आघाडी असलेल्या जनविकास सेनेने काँग्रेसला (Congress) थेट इशारा दिला आहे.

Chandrapur Municipal Politics : ...मात्र तसे न झाल्यास भाजपप्रमाणे काँग्रेसशीही लढू

जनविकास सेनेचे 3 नगरसेवक निवडून आले असून या संघटनेचे प्रमुख पप्पू देशमुख यांनी या निवडणुकीत 66 पैकी 42 नगरसेवक भाजप विरोधी मताचे निवडून आल्याचे सांगत यंदाची निवडणूक भाजपविरोधी होती, हे काँग्रेस नेत्यांनी लक्षात घेण्याची भूमिका मांडली. त्यातच काँग्रेसच्या अंतर्गत कलहामुळे जर भाजपचा महापौर झाला तर त्याच क्षणी आमची काँग्रेसशी असलेली आघाडी तोडू, असे स्पष्ट संकेतदिलेआहे. आम्ही काँग्रेससोबत राहण्याचा आणि शहराला स्वच्छ- पारदर्शक कारभार देण्याचा शब्द दिला आहे. मात्र तसे न झाल्यास भाजपशी ज्याप्रमाणे लढलो त्याचप्रमाणे काँग्रेसशी लढू, असे म्हणत एक पाऊल पुढे टाकले आहे.

Vijay Wadettiwar :  महापौर पद धानोरकर गटाला, वडेट्टीवार गटातील नगरसेवकांमध्ये नाराजी

दरम्यान, चंद्रपूर महापालिका संदर्भात काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सुचवलेल्या तोडग्याबद्दल महत्त्वाचे अपडेट समोरआलंआहे. काँग्रेस श्रेष्ठींनी चंद्रपुरातील महापौर पद धानोरकर गटाला देण्याचा जो तोडगा काढला आहे, त्याबद्दल वडेट्टीवार गटातील नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे. जास्त नगरसेवक वडेट्टीवार गटाकडे असतानाही महापौर पद धानोरकर गटाकडे का? असं वडेट्टीवार गटातील अनेक नगरसेवकांना वाटत आहे. आमची संख्या जास्त असूनही सत्तेत आम्हाला योग्य व सन्मानजनक वाटा मिळत नाही, अशी नगरसेवकांची भावना असल्याची माहिती आहे. आज संध्याकाळपर्यंत पक्ष यासंदर्भात काही स्पष्टता देईल अशी अपेक्षा वडेट्टीवार गटातील नगरसेवकांना आहे.

चंद्रपूर : एकूण नगरसेवक 66 (Chandrapur Election 2026 Result)

सध्याचे संख्याबळ

भाजप – 23

काँग्रेस – 27

काँग्रेस समर्थित जनविकास सेना – 3

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 6

वंचित - 2

बसपा - 1

शिवसेना (शिंदे गट) – 1

अपक्ष – 2

एमआयएम – 1