Continues below advertisement

Prabhu Shelkes Inspiring Life Story: बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाला सुरूवात झाली. या रिअॅलिटी शोमधील स्पर्धकांची नावेही समोर आली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून हे स्पर्धक खास बिग बॉसच्या घरात कल्ला करण्यास आले. गेल्या सिझनमध्ये झापूक झुपूक कलाकार सुरज चव्हाणने ट्रॉफी जिंकली. इतर कलाकारांनी उत्तमरित्या टास्क पूर्ण करून खेळ खेळला. परंतु, महाराष्ट्राचं मत सुरज चव्हाणच्या पारड्यात पडलं. यंदाच्या सिझनमध्ये सिनेसृष्टी ते सोशल मीडिया गाजवणाऱ्या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. या स्पर्धकांमध्ये छोटा डॉन अर्थात प्रभू शेळके चर्चेत आला आहे.

छोटा डॉन विनोदी रिल्स आणि हटके स्टाईलसाठी ओळखला जातो. त्यानं हालाखीच्या दिवसातून मार्ग काढत स्वत:चं एक अस्तित्व निर्माण केलं. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभू शेळके हा जालना जिल्ह्यातील परतूर तालु्क्यातील वलखेड या गावचा रहिवासी आहे. अत्यंत गरीब कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याला खरी ओळख सोशल मीडियातून मिळाली. त्याचे इन्स्टाग्रामवर 2.3 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच्या हटके कंटेटमधून त्याला खरी ओळख मिळाली.

Continues below advertisement

पण छोटा डॉन गंभीर आजाराशी झुंज देत आहे. थॅलेसेमिया या गंभीर आजाराशी प्रभू शेळके झुंज देत असल्याची माहिती समोर येत आहे. या रोगावर उपचार घेण्यासाठी खर्च देखील अधिक होणार आहे. त्याच्या उपचारासाठी आई वडिलांना मोठं पाऊल उचलावं लागलं. त्यांनी त्यांचं वावर विकल्याची माहिती आहे. पण आपल्या या आजाराचं कुठलंही भांडवल न करता, त्यानं चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळवलं. त्यानं आपल्या संघर्षाची कहाणी बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना सांगितली. यावेळी सगळे भावूक झाले. तसेच बिग बॉसचे होस्ट रितेश देशमुख देखील भावूक झाले.

प्रभू शेळकेनं निवडला मेहनतीचा मार्ग

बिग बॉस मराठी सिझन 6 मध्ये 17 स्पर्धकांनी एन्ट्री घेतली. स्पर्धकांना शॉर्टकट आणि मेहनत असे दोन पर्याय होते. प्रभू शेळकने शॉर्टकटचा मार्ग न निवडता मेहनतीचा मार्ग निवडला. यावेळी त्यानं, "इथपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनतीचा मार्ग निवडला. इथून पुढेही मेहनतीचा मार्ग निवडून खेळ खेळणार", असं प्रभू शेळके म्हणाला.  दरम्यान, प्रभू शेळकेला प्रेक्षकांकडून किती साथ मिळेल, पाहूयात.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बोल्ड-बिनधास्त, अभिनेत्री रविना टंडन शिवसेनेची मशाल घेऊन मैदानात; उद्धव ठाकरेंचं केलं कौतुक, VIDEO व्हायरल

'मला आत्महत्या करण्याची इच्छा..' प्रसिद्ध अभिनेत्रीवर थेरपी घेण्याची वेळ; आयुष्यात नेमकं काय घडलं?