South Actress Parvathy Shares Painful Phase of Life: साऊथ अभिनेत्री पार्वती तिरूवोथु सध्या चर्चेत आहे. चर्चेत असण्यामागचं कारणही वेगळं आहे. तिनं अलिकडेच एक वेदनादायक अनुभव शेअर केला आहे. पार्वतीनं आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. परंतु, एक काळ असा होता की तिला, मानसिक संतुलन राखण्यासाठी थेरपीवर अवलंबून राहावे लागले होते. अभिनेत्रीनं स्पष्ट केले की, तिला दिर्घकाळ एकटेपणाचा सामना करावा लागला होता. या बिघडलेल्या मानसिक स्थितीतून बाहेर पडण्यासाठी एक चांगला थेरपिस्ट सापडला नाही, असं ती म्हणाली. तिने अलिकडेच तिच्या मानसिक स्थितीबद्दल खुलासा केला आहे. त्यावेळेस अभिनेत्रीच्या मनात आत्महत्येचा विचार येत असल्याचा खुलासाही केला.
वैयक्तिक आयुष्याबाबत बरेच खुलासे
एका मुलाखतीत अभिनेत्रीनं तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बरेच खुलासे केले. पार्वती म्हणाली, "थेरपी सुरू करण्याचा निर्णय घेणे हा आयुष्यातील सर्वोत्तम निर्णयांपैकी एक होता. परंतु, चुकीच्या थेरपिस्टमुळे मनाचा त्रास आणखी बळावला असता. थेरपिस्ट शोधण्यासाठी बराच वेळ गेला. चांगला थेरपिस्ट सापडेपर्यंत मला अनेक वाईट थेरपिस्टटचा सामना करावा लागला", असं पार्वती म्हणाली. तिच्या आयुष्यातील एका वाईट काळाबद्दल बोलताना पार्वती म्हणाली, "एक काळ असा होता जेव्हा मी खूप एकटी होती. मी मित्रांना सांगितले की, मी थेरपिस्ट शोधत आहे. माझी अवस्था तेव्हा खूप वाईट झाली होती".
दोन थेरपी सुरू
"मनात आत्महत्येचा विचार येऊ लागला होता. जानेवारी - फेब्रुवारी 2021मध्ये माझ्यासोबत नेमकं काय घडलं? हे मला अजूनही आठवत नाही. सर्व काही अस्पष्ट होतं. त्यानंतरची थेरपी माझ्यावर काम करू लागली. योग्य थेरपी आणि थेरपिस्टमुळे आयुष्यात सकारात्मक बदल झाला", असं मानसिक स्थितीबाबत अभिनेत्री म्हणाली. पार्वती म्हणाली, "माझ्यावर दोन प्रकारचे थेरपी सुरू आहे. एक म्हणजे EDMR यामुळे माझ्या आयुष्यात खूप फरक पडला. माझ्याकडे एक सेक्स थेरपिस्ट देखील आहे. याचा अर्थ असा की, माझी प्लेट सध्या भरलेली आहे. काम, मित्र, कुटुंब आणि स्वत:ला पुन्हा शोधण्याच्या प्रक्रियेने संपूर्ण आहे. पण लोक म्हणतात की, 30 वर्षांनंतर, व्यक्ती जवळच्या येऊ लागते. यामुळे नातेसंबंधांच्या त्यांचा दृष्टिकोनही बदलतो", असं अभिनेत्रीनं स्पष्ट केलं. "जीवन अधिक संतुलित आणि पूर्ण वाटू लागते", असंही अभिनेत्रीनं स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री लग्नबंधनात अडकली; गायकासोबत ख्रिश्चन पद्धतीने विवाह, PHOTO व्हायरल