मुंबई : मुंबई महाराष्ट्राचे शहर नाही म्हणणाऱ्या तामिळनाडू भाजपचे नेते के अण्णामलाई (K Annamalai) यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना ठाकरे बंधूंवर टीका केली. आपल्यावर टीका करणारे ठाकरे बंधू मूर्ख आहेत, त्यांना मूलभूत समज नाही असं अण्णामलाई म्हणाले. आपल्याला मुंबईत येण्यापासून कुणी रोखू शकत नाही, आपण मुंबईत येणारच, तुम्हाला काय करायचं ते करा असं जाहीर आव्हानही दिलं आहे. के अण्णामलाई यांच्या या वक्तव्यानंतर आता पुन्हा वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी आलेल्या तामिळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई यांनी मुंबई शहर महाराष्ट्राचं नसल्याची मुक्ताफळे उधळली होती. त्यावरुन राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली. तसेच शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तूनही त्यांच्यावर टीका झाली.
सर्वबाजूंनी टीका होत असल्याने के अण्णामलाई यांनी तामिळ माध्यमांमध्ये त्यांची बाजू स्पष्ट केली. तामिळ भाषेतून बोलताना के अण्णामलाई म्हणाले की, "माझ्यावर टीका करणारे लोक मूर्ख आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारताचे पंतप्रधान म्हणताना ते गुजराती नाहीत असा अर्थ होतो का? आपण मुंबईला जगाची राजधानी म्हणतो, तर याचा अर्थ ते महाराष्ट्रीयांनी उभारलेले शहर नाही का?"
K Annamalai On Thackeray : ठाकरेंना आव्हान
के अण्णामलाई पुढे म्हणाले की, "माझ्यावर टीका करणारे लोक मूर्ख आहेत आणि त्यांना मूलभूत समजही नाही. मी मुंबईत आलो तर माझे पाय तोडण्यात येतील असं सामना वृत्तपत्रात लिहिलंय. मी मुंबईत येणार आहे, तुम्हाला जे करायचं ते करा. मी अशा धमक्यांना घाबरत नाही."
K Annamalai Statement On Mumbai : नेमकं काय म्हणाले के अण्णामलाई?
"राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघे जण सध्या कोणतेही ठोस काम नसल्याने इकडे-तिकडे फिरत आहेत. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. मी जेव्हा तामिळनाडू भाजपचा प्रदेशाध्यक्ष होतो, तेव्हा माझ्या कार्यालयात लावलेल्या छायाचित्रांपैकी एक छायाचित्र छत्रपती शिवाजी महाराजांचे होते.
जसे आमच्या राज्यात ‘मुरासोली’ हे वृत्तपत्र आहे, तसेच शिवसेनेचे ‘सामना’ नावाचे वृत्तपत्र आहे. त्या वृत्तपत्रात असे लिहिण्यात आले की, मी मुंबईत प्रवेश केला तर माझा पाय तोडतील. मी मुंबईत येणार आहे, तुम्हाला जे करायचे आहे ते करा. जर मी अशा धमक्या आणि दहशतीला घाबरलो असतो, तर मला आयुष्यभर माझ्या गावी घरातच बसून राहावे लागले असते.
आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताचे नेते म्हणतो, तर याचा अर्थ ते गुजराती राहात नाहीत का? आपण कामराज यांना भारताचे महान नेते म्हणतो, तर याचा अर्थ ते तामिळ नाहीत का?
त्याचप्रमाणे, आपण मुंबईला जगाची राजधानी म्हणतो, तर याचा अर्थ ते महाराष्ट्रीयांनी उभारलेले शहर नाही का? मराठी बांधव-भगिनींच्या कष्टातून मुंबई उभी राहिली नाही का? हे सगळे या शहराच्या अभिमान आणि ओळखीशी संबंधित विषय आहेत.
माझ्यावर टीका करणारे लोक मूर्ख आहेत आणि त्यांना मूलभूत समजही नाही. आज जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर या लोकांना काहीही स्थान राहिले नसते. हे लोक फक्त आपल्या वडिलांच्या वारशाला नुकसान पोहोचवण्यासाठीच काम करत आहेत."
ही बातमी वाचा: