Bigg Boss 19, Himanshi Narwal: 'बिग बॉस 19' (Bigg Boss 19) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच यंदाच्या पर्वात बिग बॉसच्या घरात गोंधळ घालायला कोण कोण असणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अशातच आता, कित्येकांच्या नावाच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. अशातच एका नावानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे, ते ना म्हणजे,  हिमांशी नरवाल. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack Case) प्राण गमावलेल्या विनय नरवाल (Vinay Narwal) यांची ती पत्नी आहे. दरम्यान, सलमान खानच्या (Salman Khan) शोची ऑफर हिमांशीला मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

‘टेली चक्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस’चे निर्माते हिमांशीला शोमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण तिची कहाणी भावनिकदृष्ट्या प्रेक्षकांशी कनेक्ट होईल, असं त्यांचं मत आहे. “निर्माते काही अशा लोकांच्या शोधात आहेत, जे प्रेक्षकांशी लगेच कनेक्ट होऊ शकतील. त्यातच हिमांशी नरवालचं नाव चर्चेत होतं. परंतु हिमांशी निर्मात्यांना होकार दिला की नाही, याबाबतची अधिकृत माहिती समोर आली नाही”, अशी माहिती शोच्या सूत्रांनी दिली.

लग्नाच्या आठवडाभरातच पती शहीद 

नौदल अधिकारी विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी नरवाल काश्मीरला फिरायला गेले होते. 22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात विनय नरवाल शहीद झाले होते. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या आठवडाभरापूर्वीच विनय आणि हिमांशी यांचं लग्न झालं होतं आणि दोघंही हनिमूनसाठी काश्मीरला गेले होते. पण, दुर्दैवानं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात विनय नरवाल शहीद झाले. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाजवळ बसून रडतानाचा हिमांशीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काळीज पिळवटणारा हा फोटो पाहून संपूर्ण देश हळहळला होता. 

मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमयेलाही ऑफर 

 दिग्गज मराठी अभिनेता उपेंद्र लिमये यंदा बिग बॉसच्या घरात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता स्वतः उपेंद्र लिमये यांनी याबाबत खुलासा केला आहे. उपेंद्र लिमये यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलंय की, "बिग बॉसच्या नव्या पर्वात सहभागी होण्याबाबत मला अनेकांकडून विचारणा झाली. पण, मी सांगू इच्छितो की, मी या शोचा भाग नाही. तुमचा समजूतदारपणा आणि सपोर्ट यासाठी धन्यवाद"

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bigg Boss 19, Salman Khan: उपेंद्र लिमयेला 'बिग बॉस 19'ची ऑफर? अभिनेत्यानं सगळं खरं खरं सांगून टाकलं...