Police Bharati Maharashtra Cabinet Decisions : महाराष्ट्रातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतिक्षा आज अखेर संपली आहे. आज मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (State Cabinet meeting) तब्बल 15 हजार पोलीसपदांच्या भरतीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पोलिस दलात तब्बल 15 हजार नवीन भरतींना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister of Maharashtra Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मंगळवार 12 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मंत्रिमंडळाने आणखी चार महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.
याशिवाय मंत्रिमंडळाने आणखी चार महत्त्वाचे निर्णय घेतले –
- अन्न, नागरी पुरवठा विभाग (Ministry of Food, Civil Supplies and Consumer Protection) - राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण.
- विमानचालन विभाग (Ministry of Civil Aviation) - सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय.
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (Ministry of Social Justice) - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ.
- गृह विभाग (Ministry of Home Affairs Government of Maharashtra) - महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15,000 पोलिस भरतीस मंजुरी.
पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी काय करणे गरजेचे?
पोलीस भरतीची स्वप्ने पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच सज्ज व्हायला हवे. शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखत, या तिन्ही टप्प्यांसाठी सखोल तयारी करणे गरजेचे आहे. तसेच, भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया नीट तपासावी. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत भरत गोगावलेची दांडी
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रत्यक्ष उपस्थित नसतील. एकनाथ शिंदे हे सध्या श्रीनगरमध्ये आहेत. त्यामुळे ते या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहतील. तर शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेही आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. रायगड जिल्ह्यात 15 ऑगस्टला ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना दिल्याने जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांना दिले जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे भरत गोगावले हे नाराज होऊन दिल्लीला गेल्याची चर्चा आहे. मात्र, भरत गोगावले यांनी दिल्लीत काही काम असल्याने आज मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी नाराजीचे वृत्त फेटाळून लावले.
हे ही वाचा -