Bigg Boss 19, Salman Khan: बॉलिवूडचा (Bollywood News) दबंग भाईजान सलमान खान (Salman Khan) होस्ट करत असलेला प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चं (Bigg Boss 19) नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाचं हे 19वं पर्व असून यावेळी घरात कोण कोण सामील होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बिग बॉसच्या घरात कोणते चेहरे सामील होणार याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता एका मराठमोळ्या दिग्गज अभिनेत्याचं नावंही चर्चेत आहे. दिग्गज मराठी अभिनेता उपेंद्र लिमये (Marathi Actor Upendra Limaye) यंदा बिग बॉसच्या घरात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता स्वतः उपेंद्र लिमये यांनी याबाबत खुलासा केला आहे.
'बिग बॉस 19' या सीझनची घोषणा झाल्यापासून सलमान खानचे विविध प्रोमो समोर आले आहेत. पण, अजूनही यंदा बिग बॉसच्या घरात कोणते स्पर्धक दिसणार? याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. असं असलं तरीसुद्धा अनेक सेलिब्रिटींच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच उपेंद्र लिमये सलमान खानच्या 'बिग बॉस 19' मध्ये येणार असल्याचं बोललं जात आहे.
अभिनेता उपेंद्र लिमये यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलंय की, "बिग बॉसच्या नव्या पर्वात सहभागी होण्याबाबत मला अनेकांकडून विचारणा झाली. पण, मी सांगू इच्छितो की, मी या शोचा भाग नाही. तुमचा समजूतदारपणा आणि सपोर्ट यासाठी धन्यवाद" उपेंद्र लिमयेनं दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता 'बिग बॉस 19'च्या पर्वात तो दिसणार नाही, हे जवळपास स्पष्ट झालं आहे.
पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या नौदल अधिकाऱ्याची पत्नीही होणार सहभागी?
टेली चक्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, 'बिग बॉस'चे निर्माते हिमांशीला शोमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण तिची कहाणी भावनिकदृष्ट्या प्रेक्षकांशी कनेक्ट होईल, असं त्यांचं मत आहे. “निर्माते काही अशा लोकांच्या शोधात आहेत, जे प्रेक्षकांशी लगेच कनेक्ट होऊ शकतील. त्यातच हिमांशी नरवालचं नाव चर्चेत होतं. परंतु हिमांशी निर्मात्यांना होकार दिला की नाही, याबाबतची अधिकृत माहिती समोर आली नाही”, अशी माहिती शोच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, 'बिग बॉस 19'ची घोषणा झाल्यापासूनच अनेक नावं चर्चेत आहेत. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम गुरुचरण सिंग आणि शैलेश लोढा, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर अपूर्वा मखिजा, गायक रफ्तार आणि नृत्यांगना धनश्री वर्माच्या नावाच्या चर्चा सुरू होत्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :