Malati Chahar Bigg Boss 19: बिग बॉस 19 मधील स्पर्धेक ( Big Boss 19) मालती चहर (Malati Chahar) आणि फरहाना भट्ट (Farhana Bhatt) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मालती चहर आणि फरहाना भट्ट यांचा हा 13 नोव्हेंबरचा व्हिडीओ आहे. बिग बॉसच्या घरात अनेकवेळा मालती चहर आणि फरहाना भट्ट यांच्यात वाद होत असतो. कालही मालती आणि फरहाना यांच्यात शाब्दिक वाद रंगला. यावेळी मालती चहर फरहाना भट्ट हिला तेरे मुंह मै लठ...असं म्हणाली. यावर फरहाना छी..छी...असं म्हणत तेरेही मुंह मै लठ असं बोलली. तसेच लठ वैगरे मला माहिती नाही, असंही फरहानाने सांगितले. यावर लठ म्हणजे दंडा (काठी) असं मालती चहर म्हणाली. तु जास्त बोलत असते म्हणून तुझ्या तोंडात लठ...असं मालतीने फरहानाला सांगितले. यादरम्यानचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कोण आहे मालती चहर? (Who Is Malati Chahar)
मालती चहर ही भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण आहे, जी एक अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि मॉडेल आहे. ती 'बिग बॉस 19' मध्ये एक वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती आणि सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत आहे. मालती चहरने अभिनयात प्रवेश करण्यापूर्वी आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले होते. तिने फेमिना मिस इंडियाच्या फायनलमध्येही प्रवेश केला होता. मालती चहरने 'माँ ओ मेरी मां' (2025), 'सदा विह्या जी' (2022) आणि 'ओ माएरी' (2025) सारख्या चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे.
मालतीचा जन्म 15 नोव्हेंबर 1990 रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा याठिकाणी झाला. तिच्यासह कुटुंबातील सर्वच सदस्य क्रीडाप्रेमी आहे. मालतीने सौंदर्य स्पर्धांमधून विशेष ओळख मिळवली. मालती 2014 च्या फेमिना मिस इंडियामध्ये अंतिम फेरीत पोहोचली होती आणि 'फेमिना मिस इंडिया दिल्ली 2014'मध्ये तिने 'मिस फोटोजेनिक' हा किताबही जिंकला. त्यानंतर तिने अभिनयाकडे मोर्चा वळवला. 2018 साली आलेल्या मध्ये अनिल शर्मा दिग्दर्शित 'जिनिअस' या बॉलिवूड सिनेमातून तिने पदार्पण केले.