Continues below advertisement

Bigg Boss 19 : बिग बॉस सीझन 19 (Bigg Boss 19) च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये डबल एव्हिक्शन झालं. यामध्ये नतालिया आणि नगमा हे दोन स्पर्धक एव्हिक्ट झाले. नवीन आठवड्यानुसार घरात नॉमिनेशनची प्रक्रिया सुरु झाली. मात्र, या नॉमिनेशन (Nomination) प्रक्रियेआधीच घरात एका मोठ्या नियमाचं सदस्यांकडून उल्लंघन करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉसच्या घरात संपूर्ण घरातील सदस्य नॉमिनेट करण्यात आले आहेत. याचं कारण म्हणजे, घरात उघडपणे नॉमिनेशनची चर्चा करण्यात आली.

बिग बॉसच्या घरात नवीन आठवडा सुरु झाला आहे. नवीन आठवडा म्हटल्यानंतर नॉमिनेशन टास्क हा आलाच. मात्र, यंदाचा नॉमिनेशन टास्क हा जरा वेगळाच ठरला. याचं कारण म्हणजे बिग बॉसच्या घरात सर्व सदस्यांनी उघडपणे नॉमिनेशनची चर्चा केली. यामुळे बिग बॉसने सर्व सदस्यांना नॉमिनेट केल्याचं पाहायला मिळणार आहे. आजच्या भागात हा सगळा ड्रामा पाहता येणार आहे. यामध्ये अमाल मलिक हा घरातील कॅप्टन असल्यामुळे तो वाचला. मात्र, घरातील सदस्यांना वॉर्निंग दिल्यानंतर त्यांच्याकडून काही टास्क करुन घेतले यात घरातील 5 सदस्य नॉमिनेट झाले.

Continues below advertisement

नॉमिनेशन टास्क प्रोमो (Nomination Task Promo)

यावेळच्या नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील सदस्यांना कोणाला नॉमिनेशनची नावं न घेता तुम्हाला कोणत्याही दोन सदस्यांना वाचवायचं आहे. अशा दोन सदस्यांची नावं घेण्याचा हक्क दिला. त्यानुसार, घरातील सदस्यांनी कन्फेशन रुममध्ये आपल्या खास आणि आवडत्या सदस्यांची नावं सांगून कारणं दिली.

कोण होणार नॉमिनेट? (Who Will Be Nominated?)

नॉमिनेशन प्रक्रियेत या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झालेल्या सदस्यांची नावे आहेत.. नेहल चुडासमा, अशनूर कौर, बसीर अली, अभिषेक बजाज आणि प्रणित मोरे. आता या आठवड्यात कोण एव्हिक्ट होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेमच्या दृष्टीने पाहिल्यास प्रणित मोरे किंवा बसीर अली घराबाहेर जाण्याची शक्यता आहे. कारण घरातील इतर सदस्यांपेक्षा यांचा खेळ थोडा मागे पडताना दिसतोय. मात्र, याबाबतीत कोणतीच खात्री देता येणार नाही. कारण बिग बॉसचा यंदाचा सीझन हा लोकशाहीचा आहे. त्यामुळे आता घराबाहेर कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा :

Bigg Boss 19 Kunika Sadanand Son Ayaan: 'जेव्हा माझ्या गर्लफ्रेंड होत्या, तेव्हा माझ्या आईचे बॉयफ्रेंड होते'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अफेअरबाबत लेकाचा खळबळजनक खुलासा