Bigg Boss 19 : सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे बिग बॉसची (Bigg Boss 19). हा शो जितका नातेसंबंध, कॅप्टन्सी आणि टास्कसाठी ओळखला जातो. तितकेच बिग बॉसमधील वादही चर्चेचा विषय ठरतात. नुकताच या शोमध्ये कॅप्टन्सी टास्क झाला. या दरम्यान घरातील सर्वात मोठी लढाई पाहायला मिळाली.
बिग बॉस सिझन 19 सुरु झाल्यापासूनच बसीर अली आणि अभिषेक बजाज या दोघांमध्ये भांडण आणि वादविवाद प्रेक्षकांना पाहायला मिळाले. मात्र, यावेळी चर्चेचा मुद्दा वेगळाच ठरला आहे. एकीकडे बसीर आणि अभिषेकची फाईट तर दुसरीकडे नेहल चुडास्माला (Nehal Chudasama) बिग बॉसच्या घरात रडताना पाहायला मिळाले. याचं कारण म्हणजे, नेहल चुडास्माने टास्क दरम्यान अमाल मलिकवर (Amal Malik) चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे.
नेहलचा अमाल मलिकवर गंभीर आरोप
खरंतर, बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीचा टास्क रचण्यात आला होता. या टास्कसाठी दोन टीममध्ये विभागणी करण्यात आली. या टास्कमध्ये जे ब्लॅकबोर्डवर बराच वेळ लिहू शकतील असे दोन्ही टीममधून एक एक सदस्य निवडण्यात आले. तर त्यांच्या विरोधात फळ्यावरील लिहीलेलं पुसण्यासाठी दोन सदस्य निवडण्यात आले. या टीममध्ये बसीर आणि बजाजमध्ये खेळ रंगला. तर, अमाल आणि नेहल यांच्यात खेळ रंगला. या दरम्यान, अमालने आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप नेहलने केला आहे.
अमालने मागितली नेहलची माफी
टास्कनंतर, अमाल मलिक अनेकदा नेहलची माफी मागताना दिसला. आपण चुकीच्या पद्धतीने स्पर्श नाही केला हे तो तिला वारंवार सांगताना दिसला. मात्र, त्यानंतरही नेहल अमाल विरोधात घरच्या सदस्यांना सांगताना दिसली. अमालची चूक नसतानाही त्याच्यावर केलेला आरोप बिग बॉस तसेच अमालच्या फॅन्सना आवडला नाही. यावरुन सोशल मीडियावर नेहल ट्रोल होताना दिसली.
का भडकले प्रेक्षक?
सोशल मीडियावर नेहलच्या वाईट वागणुकीवर प्रेक्षक नाराज झाले. एक्सवर त्या टास्कचे अनेक व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांकडून नेहलवर राग व्यक्त करण्यात आला आहे. एका यूजरने व्हिडीओ शेअर करत लिहीलं आहे की, अमालने खरंच काही केलं नव्हतं. पण, नेहल रडली आणि तिने वाईट आरोप केले. तर, दुसऱ्या युजरने लिहीलं आहे की, अमालची चूक नसताना त्याने माफी मागितली. तर, महिला आणि विक्टीम कार्ड खेळणं ही यांची सवय आहे अशा पद्धतीने फॅन्सने कमेंट करत नेहलला ट्रोल केलं आहे. तर, अशा बऱ्याच कमेंट्स करत प्रेक्षकांनी अमाल मलिकला जाहीर पाठिंबा दिला तर नेहलला ट्रोल केलं आहे. आता या टास्कनंतर बिग बॉस शोचा होस्ट सलमान खान यावर काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे.
हे ही वाचा :