Weekly Horoscope 15 To 21 September 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक सण समारंभांसह मोठ मोठ्या ग्रहांची देखील स्थिती बदलणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष राशीची लव्ह लाईफ (Aries Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी नक्की वेळ काढा. तसेच, पार्टनरचा अपमान करु नका. जे लोक नव्याने नात्यात येऊ पाहतायत त्यांना सावध राहण्याची गरज आहे.
करिअर (Career) - कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावध राहावं लागेल. ऑफिस पॉलिटिक्सशी संबंधित बाबतीत तुम्हाला अडचणी येऊ शकतात. संवादकौशल्य वाढवण्याची गरज आहे.
आर्थिक स्थिती (Wealth) - सध्या तुमची आर्थिक स्थिती सुरळीत राहील. लवकरच आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, स्मार्ट गुंतवणूक करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला छोट्या मोठ्या तक्रारी जाणवू शकतात. यासाठी नियमित आहार घ्या. खाण्या पिण्यावर लक्ष केंद्रित करा. मानसिकदृष्ट्या फिट राहा.
वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - वृषभ राशीसाठी नवीन आठवडा प्रेमाच्या बाबतीत सावधानतेने निर्णय घेण्याची गरज आहे. तुमच्या नात्याचा तुमच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.
करिअर (Career) - आठवड्याच्या सुरुवातीला प्रोडक्टिव्हिटीशी संबंधित गोष्टींचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांचा ओरडा खावा लागण्याची शक्यता आहे.
आर्थिक स्थिती (Wealth) - नवीन आठवड्यात तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावू शकते. भावा-बहिणीबरोबर चांगला व्यवहार ठेवा. तसेच, पैशांचा गैरव्यवहार करु नका.
आरोग्य (Wealth) - आरोग्याशी संबंधित समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. यासाठी नियमित योगासन आणि ध्यान करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहे. गर्भवती महिलांनी भरपूर पाणी प्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :