Bigg Boss 18: सध्या मनोरंजनसृष्टीत आगामी सिनेमांचं जोरदार प्रमोशन चाललंय. प्रमोशन करण्यासाठी टेलिव्हिजन मधील कोणत्या ना कोणत्या रियालिटी शोमध्ये कलाकार येत असतात. त्यात बिग बॉस 18 च्या प्रोमोमध्ये सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसल्याचं दाखवण्यात आले आहे. सध्या रोहित शेट्टीचा सिंघम अगेन या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. 1 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होण्यासाठी सज्ज झालाय. दरम्यान सलमानच्या शोमध्ये बिग बॉसच्या घरात रोहित शेट्टीसह बाजीराव सिंघम ची गर्जना आणि चुलबुल पांडेचा swag पाहायला मिळणार आहे. 

Continues below advertisement


भाईजानचा swag, सिंघमही तयार 


कलर्स टीव्ही ने त्यांच्या instagram पेजवरून शेअर केलेल्या एका प्रोमोमध्ये रोहित शेट्टी दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसलेला दिसतो. यात तो अजय आणि सलमान या दोघांनाही तो तयार असल्याचा विचारतो. तेव्हा भाईजान स्वॅग मध्ये तयार असल्याचं सांगतो तर सिंघमही तयार आहे असे उत्तर देतो. रोल कॅमेरा ॲक्शन म्हणत विकेंड का वारला सुरुवात होते. 


चुलबुल पांडेने मारली सिंघमला मिठी 


सलमानच्या बिग बॉस 18 या शोची सध्या चांगलीच हवा आहे. या शोचा टीआरपी आणि प्रेक्षकांमध्ये असणारी उत्सुकता लक्षात घेऊन सिंघम अगेन चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी रोहित शेट्टी आणि अजय देवगण बिग बॉसच्या शोमध्ये आले आहेत. कलर्स टीव्हीने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पहिल्यांदाच चुलबुल पांडे आणि बाजीराव सिंघम एकाच मंचावर दिसले. दोघांचीही स्वॅगमध्ये एन्ट्री झाली. आणि शेवटी चुलबुल पांडेने सिंघमला मिठी मारत वीकेंड का वार शूट झाला.