Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि नागपूर पूर्व मतदारसंघातून महायुतीच्या बंडखोर उमेदवार आभा पांडे (Abha Pande) यांनी भाजप उमेदवार कृष्णा खोपडे (Krishna Khopde) यांच्या प्रतिज्ञापत्रा संदर्भात आक्षेप घेतले आहे. कृष्णा खोपडे यांच्या प्रतिज्ञापत्रात अनेक चुका असून त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये द्यावयाच्या अनेक माहिती लपवल्याचा आभा पांडे यांचा आरोप आरोप आहे. दरम्यान या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचे मुद्दे ऐकून घेतले आहेत. तर थोड्या वेळानंतर निवडणूक निर्णय अधिकारी त्यांचा निर्णय देण्याची शक्यता आहे.
भाजप उमेदवार कृष्णा खोपडे यांच्यासाठी मोठी अडचण?
राज्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पहिली बंडखोरी नागपुरातून झाली आहे. नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आभा पांडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत, कोणत्याही परिस्थितीत पूर्व नागपूर मधून माझा उमेदवारी अर्ज परत घेणार नाही, असंही जाहीर करून टाकलं आहे. पक्षश्रेष्ठींनी निर्देश दिले तरीही मी पूर्व नागपूरच्या मैदानातून हटणार नाही. असं आभा पांडे म्हणाल्या. माझी लढत भाजप उमेदवारासोबत आहे, भाजपचे विद्यमान आमदार आणि यंदाचे उमेदवार कृष्णा खोपडे यांनी पंधरा वर्षात कोणतेही विकास काम केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी मला जनतेमधूनच आग्रह असल्याचा दावाही पांडे यांनी केला.
विशेष म्हणजे आभा पांडे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिव आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या आहेत. दरम्यान, त्यांनी आता महायुतीतील प्रतिस्पर्धी असलेल्या आणि पूर्व नागपुरातील भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांच्यावर आरोप केले आहे. नुकतेच कृष्णा खोपडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र आभा पांडे यांचे आक्षेप ग्राह्य धरले, तर नागपूर पूर्व मतदारसंघात भाजप उमेदवार कृष्णा खोपडे यांच्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते
नागपुरातील 12 विधानसभा क्षेत्रांपैकी 11 मतदारसंघात भाजपचाच वरचष्मा
राज्याच्या राजकारणात महत्वाचा ठरलेला विदर्भात भाजपचाच बोलबाला असल्याचे बघायला मिळाले आहे. तर एकट्या उपराजधानी नागपुरातील 12 विधानसभा क्षेत्रांपैकी 11 मतदारसंघात भाजपचाच वरचष्मा असल्याचे चित्रा आहे. तर एकट्या रामटेकच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाला समाधान मानावे लागले आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला नागपुरात (Nagpur) कुठेही स्थान नाही. त्यामुळे आगामी काळात भाजप किती जागांवर विजय संपादन करेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा