Bhool Bhulaiyaa 2 : सध्या अभिनेता  कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan)   भूल भुलैय्या-2 (Bhool Bhulaiyaa 2) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि प्रेक्षकांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 20 मे रोजी हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपटानं  तीन दिवसांमध्ये 55.96 कोट्यवधींची कमाई केली आहे. अनेक सेलिब्रिटी आणि प्रेक्षक या चित्रपटाचं कौतुक करत असतात. आता 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)   यांनी देखील भूल भुलैय्या-2 चित्रपटाचे कौतुक केलं आहे. 


विवेक अग्रिहोत्री यांचे ट्वीट
विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'भूल भुलैय्या-2 चित्रपट हिट ठरल्याबद्दल कार्तिकला शुभेच्छा. 'एकला चलो रे' हे कधीच विसरु नकोस. तुझ्या कामामधून व्यक्त हो. ' विवेक यांच्या या ट्वीटला रिप्लाय देत कार्तिकनं लिहिलं, 'धन्यवाद सर'






कंगनानं देखील केलं होतं कौतुक
कंगनानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन भूल भुलैय्या -2 या चित्रपटाचं कौतुक केलं. कंगनानं पोस्टमध्ये लिहिलं, 'या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील दुष्काळ संपवला आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचे तसेच चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन.' कंगनाच्या धाकड चित्रपटाची आणि कार्तिकच्या भूल भुलैय्या -2 या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली आहे. 'ओपनिंग-डे' ला भूल भुलैय्या -2  14.11 कोटींची कमाई केली. धाकड चित्रपटाला मात्र प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही


भूल भूलैया-2 मध्ये कार्तिक आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि  राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक आर्यन हा रूह बाबा ही भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी कार्तिकनं 15 कोटी मानधन घेतलं आहे. तर कियारा आडवाणीनं या चित्रपटामध्ये रीत ठाकुर ही भूमिका साकारली आहे. कियारानं या चित्रपटासाठी दोन कोटी रूपये मानधन घेतलं आहे.