Bhojpuri Actor Dilesh Lal Yadav : दोन दिवसापूर्वी उद्योजक सुशील केडिया या उद्योजकाने मी मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा, असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं. मात्र, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला खळखट्याकने प्रत्युत्तर दिल्यानंतर सुशील केडिया याने राज ठाकरेंची माफी मागितली. दरम्यान, सुशील केडियानंतर आता आणखी एका उत्तर भारतीयाने ठाकरे बंधूंना आव्हान दिलंय.
मी मराठी बोलत नाही, मी भोजपुरी बोलतो. मी सर्वांना चॅलेंज देतो जर तुमच्यात हिंमत असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलवून दाखवा, असं म्हणत भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव याने ठाकरे बंधूंना आव्हान दिलंय.
दिनेश लाल यादव काय काय म्हणाला?
दिनेश लाल यादव म्हणाला, "...अशा प्रकारची गोष्ट देशात कुठेही घडू नये. आपला देश विविध भाषा आणि संस्कृतींसाठी ओळखला जातो, आणि या विविधतेतूनही एकतेचं उदाहरण घालून देतो. गलिच्छ राजकारण करणाऱ्या लोकांनी असं वागू नये, आणि त्यांनी स्वतःला सावरावं... मी मराठी बोलत नाही. मी उघड आव्हान देतो—तुमच्यात धमक असेल तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा."
पुढे बोलताना यादव म्हणाला, हे तोडण्याचं राजकारण करु नका. जोडण्याचं राजकारण करा. तुम्ही घाण राजकारण करु नका. मी स्वत: एक राजकारणी देखील आहे. राजकारण लोकांच्या भल्यासाठी असलं पाहिजे, असं मी मानतो. देशाच्या भल्यासाठी असली पाहिजे. कोणाची क्षमता असेल की, तो अनेक भाषा शिकू शकतो. तर त्याने शिकली पाहिजे. मराठी फार चांगली भाषा आहे. प्रेमळ भाषा आहे. भोजपुरी देखील प्रेमळ भाषा आहे. गुजराती आहे, मराठी आहे, तेलगू आहे, तमिळ आहे.. प्रत्येक भाषेचं एक वेगळं सौंदर्य आहे. क्षमता असेल तर सगळ्या भाषा शिकायला हव्यात.
इतर महत्त्वाच्या बातम्या
भारतातील सर्वात महागडा सिनेमा, 1600 कोटींचं बजेट; रणबीर कपूर की यश कोणाचं मानधन जास्त?