Bhirkit : दिप्ती धोत्रे (Dipti Dhotre)  ही  मराठी चित्रपट विश्वातली यशस्वी अभिनेत्रीपैकी एक आहे. दिप्ती तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि सुंदर लूकसाठी ओळखली जाते. दिप्ती केवळ एक मलटीटॅलेन्टेड अभिनेत्री नाही तर ती एक फिटनेस उत्साही देखील आहे आणि तिचे सोशल मीडियावरचे फिटनेस व्हिडीओ हे सर्व सांगते. दिप्ती धोत्रेला तिचे सुपरहिट चित्रपट मुळशी पॅटर्न, भोंगा, विजेता आणि शेरशिवराज साठी प्रचंड प्रसिद्धी आणि ओळख मिळाली. अभिनेत्री ने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.


दिप्ती धोत्रे नवीन चित्रपट "भिरकीट" मध्ये  सर्वाना 17 जुन पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात दिसणार आहे. भिरकिट चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहेत, भिरकिट म्हणजे नेमक काय,हे चित्रपट पाहिल्याशिवाय कळनार नाही. हा चित्रपट हास्य विनोद आणि मनोरंजन ने भरलेला असुन ,संपुर्ण कुटुंबासोबत पाहण्या सारखा चित्रपट आहे. अभिनेत्री दीप्ती धोत्रे ने या चित्रपटातला लूक सोशल मिडीयावर टाकलेला आहे.या चित्रपटात दिप्ती नगरसेवीकेची भूमिका साकारत आहे.






भिरकीट आपल्या आयुष्यात अदृश्यरितया मागे लागलेले आहे. भिरकीट आपल्या सागळयांची गोष्ट आहे.टिझर मधे सांगण्यात आले आहे,टिझर पाहिला तर आपल्याला व्यवस्थित कळेल. हा एक मल्टीस्टारर चित्रपट असून, या चित्रपटाचे दिग्दर्शक- अनुप अशोक जगदाळे, प्रोड्युसर सुरेश -ओसवाल, भाग्यवंती ओसवाल आहेत. सहकलाकार गिरीश कुलकरणी,तानाजी गलगुंडे,सागर कारंडे,कुशल बद्रीके,ऋषिकेश जोशी इत्यादी आहेत.


हेही वाचा :