Bharti Singh Video: कॉमेडियन भारती सिंह (Comedian Bharti Singh), सध्या कुकिंग रिअॅलिटी शो (Cooking Reality Show) 'लाफ्टर शेफ्स सीझन 2' (Laughter Chefs Season 2) ची होस्ट आहे. भारती सिंह (Bharti Singh) आपल्या क्लासी कॉमेडी अंदाजासाठी ओळखली जाते. कुणाशीही बोलताना अचूक टायमिंग साधत खळखळवून हसवणं, हा भारतीचा क्लासी अंदाज. एखाद्या शोचं होस्टिंग करताना ती आपल्या विनोदांनी सर्वांचं लक्ष वेधून घेते. सध्या 'लाफ्टर शेफ्स सीझन 2'मध्ये एक खास एपिसोड पार पडणार आहे. याच एपिसोडच्या शुटिंगसाठी भारती सुंदर तयार झाली होती. या एपिसोडसाठी तिनं 'हम आपके है कौन' मधल्या माधुरी दीक्षितप्रमाणे कपडे घातले होते.
भारती सिंहसोबत बॉडिशेमिंग
भारती तयार होऊन शोच्या सेटवर जाण्यासाठी निघाली, तेवढ्यात तिला पॅपाराझींनी घेरलं. त्यावेळी पॅपाराझींसाठी पोज देताना, भारतीला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. त्यापैकी एकानं तिला 'उकडलेली माधुरी दीक्षित' असं म्हटलं. भारतीनं या कमेंटला अत्यंत साधेपणानं, हसत-खेळत, विनोदानं उत्तर दिलं असलं तरी, नेटकऱ्यांना ही कमेंट आवडली नाही आणि त्यांनी भारतीला अशा प्रकारे बॉडी शेमिंग केल्याबद्दल ट्रोल केलं.
भारतीनं पॅपाराझींना काय सुनावलं?
जेव्हा पापाराझींनी भारती सिंहला 'उकडलेली माधुरी दीक्षित' असं म्हटलं, तेव्हा भारतीनं विचारलं की, "उकडलेली माधुरी दीक्षित कोणी म्हटलं? अरे हे बघा, ती उकडलेली नाही, तर तळलेली आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही..." भारतीनं पॅप्सना अत्यंत साधेपणानं आणि विनोदी शैलीनं उत्तर दिलं. नेमकं हेच तिच्या चाहत्यांना खटकलं.
नेटकऱ्यांनी पॅप्सना सुनावलं
एका युजरनं कमेंट बॉक्समध्ये लिहिलंय की, "किती भयानक कमेंट आहे, ती सुंदर दिसतेय आणि तिनं इतकी सुंदर साडी नेसलीय..." आणखी एका युजरनं लिहिलंय की, "त्या असभ्य माणसाने किती घाणेरडी कमेंट केलीय...", तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय की, "हे अजिबात मजेदार नव्हतं, हे पॅप्स इतके अनप्रोफेशनल आहेत. या पॅप्सना आणि वरिंदर चावलाला लाज वाटली पाहिजे, थोडा आदर करा." आणखी एकानं लिहिलंय की, "हे फारच असभ्य आहे..."
भारतीनं ई-टाईम्सना दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं की, "मला आता हेल्दी आणि फिट वाटतंय, याचा मला आनंद आहे. मला आता श्वास घेण्यास त्रास होणं आणि चक्कर येणं यासारख्या समस्या जाणवत नाहीत. माझं डायबिटीज आणि दमा देखील नियंत्रणात आहे. मी संध्याकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत काहीही खात नाही. मी दुपारी 12 नंतर जेवते. मी 30-32 वर्ष खूप खाल्लंय आणि त्यानंतर मी माझ्या शरीराला एक वर्ष वेळ दिला आणि या शरीरानं सर्वकाही स्वीकारलं आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :