Actor Physically Abused At 14: सेलिब्रिटींच्या आयुष्याबाबत (Celebrity Life) सर्वसामान्यांना नेहमीच कुतूहल वाटत असतं. त्यांच्याभोवती असलेला सुरक्षरक्षकांचा गराडा, त्यांनी परिधान केलेले महागडे कपडे, त्यांची ज्वेलरी, महागडे शौक... यांसारख्या बऱ्याच गोष्टींचं कुतुहल नेहमीच आपल्याला वाटत असतं. पण, आपल्याला दिसतं तितकं यांचं आयुष्य सोपं नसतं, हे काही सेलिब्रिटींचे अनुभव ऐकल्यावर लक्षात येतं. त्यांनाही कधीना कधी सर्वसामान्यांप्रमाणेच अनेक गोष्टींचा त्रास सहन करावा लागल्याचं समोर आलं आहे. अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेले भयावह आणि हादरवणारे अनुभव सार्वजनिकरित्या शेअर केले आहेत. असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना शारीरिक छळाचा कधी ना कधी सामना करावा लागला आहे. फक्त अभिनेत्रीच नाहीतर अनेक अभिनेत्यांनाही शारीरिक छळाचा (Physical Abuse) सामना करावा लागला आहे. अलिकडेच, एका टेलिव्हिजन अभिनेत्यानं (Television Actor) त्याच्यासोबत काही वर्षांपूर्वी घडलेल्या एका खळबळजनक प्रकाराबाबत खुलासा केला आहे.
अभिनेता आमिर अली (Actor Aamir Ali) म्हणजे, टेलिव्हिजनच्या जगतातील टॉप सेलिब्रिटींमध्ये समाविष्ट होणारं नाव. पण, कधीकाळी याच स्टारला शारीरिक छळाचा सामना करावा लागल्याचा खुलासा त्यानं स्वतः केला आहे. अभिनेता केवळ 14 वर्षांचा असताना त्याच्यासोबत हे दुष्कृत्य घडल्याचं अभिनेत्यानं सांगितलं. या घटनेनंतर अभिनेत्यानं ट्रेननं प्रवास करणंच बंद केल्याचंही त्यानं सांगितलं. हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आमिर अली म्हणाला की, "जेव्हा मी लहान होतो आणि ज्यावेळी मी ट्रेननं पहिल्यांदा प्रवास केला होता, त्यानंतर मी ट्रेननं प्रवास करणंच बंद केलं, कारण मला नको तसा स्पर्श केला जात होता. मी त्यावेळी 14 वर्षाचा होतो. मी माझी बॅग माझ्या पाठीजवळ ठेवायला सुरुवात केली."
"मी त्यांच्यासोबत एकाच बेडवर झोपू शकतो..."
आमिर अली पुढे म्हणाला की, "मग एके दिवशी कोणीतरी माझ्या बॅगेतून पुस्तकं चोरली आणि मी विचार करू लागलो की, पुस्तकं कोण चोरतं? आणि मी ठरवलं की, मी ट्रेननं प्रवास करणार नाही." अभिनेता पुढे म्हणाला की, माझे काही मित्र होते, जे म्हणाले की, त्यांना पुरुषांबद्दल भावना असतात आणि मी त्यांना चांगलं ओळखतो, ते माझ्या भावांसारखे आहेत. मी त्यांच्यासोबत एकाच बेडवर झोपू शकतो आणि जेव्हा ते दिसले तेव्हा मला जाणवलं की, मी फक्त काही अनुभवांवरून संपूर्ण जगाबाबत अंदाज बांधू शकत नाही. जेव्हा तुम्ही प्रौढ होता तेव्हा तुम्हाला समजतं, तुमचे विचार बदलतात."
घटस्फोटानंतर कुणाला डेट करतोय आमिर अली?
दरम्यान, आमिर अलीनं ई-टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना खुलासा केलेला की, तो कुणालातरी डेट करत आहे. याआधी आमिर अलीनं 2012 मध्ये संजीदा शेखसोबत आपली लग्नगाठ बांधली होती. दोघांनाही एक मुलगी आहे, तिचं नाव आयरा ठेवलंय. पण, लग्नाच्या 9 वर्षांनी दोघांच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडला. दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सध्या आमिर अली अंकिता कुकरेतीला डेट करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
