Abhishek Chatterjee : बंगाली मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारे अभिनेता अभिषेक चॅटर्जी (Abhishek Chatterjee) यांचे निधन झालं आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रिपोर्टनुसार, अभिषेक यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता.
काल(23 मार्च) अभिषेक हे एका शोचं शूटिंग करत होते. तेव्हा अचानक त्यांची प्रकृती बिघडली. प्रकृती बिघडल्यानं शूटिंग सुरू असलेल्या सेटवरील लोक त्यांना रूग्णालयात घेऊन जात होते. पण रूग्णालयात न जाता अभिषेक हे त्यांच्या घरी गेले. रात्री अभिषेक यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना बोलवलं. पण तेव्हा अभिषेक चॅटर्जी यांनी अखेरचा श्वास घेतला.
लाबोनी सरकार, गौरव रॉय चौधरी, ट्रिना साहा, कौशिक रॉय आणि इतर काही कलाकरांनी अभिषेक यांना श्रद्धांजली वाहिली. ममता बानर्जी (mamata banerjee) यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी यांनी ट्वीट केले की, 'अभिनेता अभिषेक चॅटर्जी यांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर दु:ख झाले.'
अभिषेक यांनी 'पथभोला', 'फिरिये दाव', 'जामाइबाबु', 'दहन', 'नयनेर आलो', 'बारीवाली', 'मधुर मिलन', 'मायेर आंचल', 'आलो और वान' या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच छोट्या पडद्यावरील ‘खोरकुटो’या मालिकेमध्ये देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली.
संबंधित बातम्या
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Dasvi Trailer: दसवीचा ट्रेलर पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेकडून रिक्षा चालकाने भाडं घेतलं नाही, विवेक अग्निहोत्रीने मानले आभार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha