Abhishek Bachchan Movie : बालिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा गेल्या काही दिवांसापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत आलाय. पण त्याचा एकही सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला नव्हता. त्यामुळे त्याच्या कामाची काहीच चर्चा नव्हती. पण आता अभिषेकच्या कामाची चर्चा सुरु झाली असल्याचं पाहायला मिळतंय. कारण अभिषेकचा नवा कोरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Continues below advertisement

अभिषेक बच्चनचा बी हॅप्पी या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आला आहे. हा सिनेमा मेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्राईम व्हिडीओच्या इन्स्टाग्राम पेजवर हा फोटो शेअर करण्यात आलाय. त्यामुळे आता लवकरच अभिषेकचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'बी हॅप्पी' सिनेमातून अभिषेक येणार भेटीला

बी हॅप्पी या सिनेमातून अभिषेकसोबत इलियाना डिसूझा, नोरा फतेही, इनायत वर्मा, जॉनी लीव्हर आणि हरलीन सेठी हे कलाकारही दिसणार आहेत. प्राईम व्हिडीओने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करतम म्हटलं की, All set to waltz right into your hearts! #BeHappyOnPrime, Coming Soon' दरम्यान हा सिनेमा  रेमो डिसूझा दिग्दर्शित करत असून रेमो डिसूझाच्या प्रोडक्शन कंपनीनेच हा व्हिडीओ शेअर केलाय.                                                                        

Continues below advertisement

अभिषेकच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा

दरम्यान मागील अनेक महिन्यांपासून अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये काहीही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरु होत्या. पण काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या आणि आराध्या जलसामध्ये दिसल्या होत्या. त्याचप्रमाणे अभिषेकनेही यावर प्रतिक्रिया देत सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये सारं काही अलबेल असल्याचं म्हटलं जातंय. पण तरीही त्यांच्यात काहीही अलबेल नसून लवकरच ते घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या मागील अनेक दिवसांपासून येत आहे.

ही बातमी वाचा : 

Sankarshan Karhade : लोकांनी भरलेलं सभागृह ,प्रयोगानंतर टाळ्यांचा कडकडाट..., कतारमध्ये मराठी नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग;संकर्षणची खास पोस्ट