Continues below advertisement

Salman Khans Battle of Galwan Teaser: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा आगामी चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान'ची सध्या चर्चा सुरूये. प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटातील सलमान खानचा प्रभावी लूक समोर आला आहे. त्याचा हा लूक पाहून चाहते अक्षरश: थक्क झाले आहेत. दरम्यान, सलमान खानच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान'बाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. यामुळे सलमान खानच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

27 डिसेंबर 2025 रोजी सलमान खान साठीत प्रवेश करणार आहे. अपेक्षाप्रमाणे चाहते आधीच सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत. या वर्षीचा वाढदिवस आणखी असेल, कारण सलमानच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' चा टीझर त्याच्या वाढदिवशी प्रदर्शित होणार आहे. सुत्राने मीडिया साईट हंगामाला सांगितले की, "चित्रपटाची संपूर्ण टीम बऱ्याच काळापासून टीझरवर काम करीत आहेत. 27 डिसेंबर रोजी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होईल. सलमान खान एका नवीन अवतारात दिसणार आहे. हा लूक चाहत्यांना नक्कीच आवडेल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Continues below advertisement

सलमान खानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर कधी रिलीज होणार?

"टीझरपूर्वी चित्रपटाचे एक किंवा दोन पोस्टर प्रदर्शित केले जातील. या चित्रपटाचे पोस्टर्स 25 किंवा 26 डिसेंबर रोजी प्रदर्शित केले जातील. त्यानंतर टीझर लाँच केला जाईल", अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटात सलमान खानसोबत चित्रांगदा सिंग मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सलमानने या चित्रपटात कर्नल बिकुमल्ला संतोष बाबू यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट शिव अरूर आणि राहुल सिंह यांचे पुस्तक 'इंडियाज मोस्ट फियरलेस'मधील एका चॅप्टरवर आधारीत आहे.

हा चित्रपट 15 जून 2020 रोजी कोव्हिड - 19 व्हायरल पसरल्यादरम्यान गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला, तेव्हाच्या घटनेवर आधारीत आहे. सध्या या चित्रपटाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

फ्लॅशबॅक! अभिनेत्रीसोबत अश्लील चॅट्स ते राहुल सोलापूरकरचा वाद; मावळत्या 2025 मध्ये सिनेसृष्टीत काय काय घडलं?

मध्यरात्री 2 पुरूषांनी दार ठोठावलं अन्..; 3 वाजता उर्फी जावेदसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट करत सांगितला विचित्र प्रकार