Bappi Lahiri : गोल्डन मॅन, डिस्को किंग अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी ( Bappi Lahiri ) काल यांचे निधन झाले.  हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने बप्पी लाहिरी यांनी विशेष ओळख निर्माण केली. त्यांच्या तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है तेरा प्यार या बप्पी लाहिरी यांच्या सुपर हिट गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.   बप्पी लाहिरी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ए. आर रेहमान, विराट कोहली, अभिनेत्री रविना टंडन, अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगण यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी बप्पी लाहिरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 


अभिनेत्री रविना टंडनने ट्वीट केले, 'तुमची गाणी ऐकत आम्ही मोठे झालो, बप्पी दा, तुमची हटके शैली आणि नेहमी हसरा चेहरा कायम लक्षात राहिल.ओमशांती'






विराट कोहलीने कू वर पोस्ट शेअर केली आहे. 'म्यूझिक इंडस्ट्रीमधील आयकॉन बप्पी लाहिरी यांच्या आत्म्याला शांती लाभो', असं त्याने लिहिले आहे. 







'बप्पी लाहिरी हे हिंदी चित्रपटसृष्टीचे डिस्को किंग होते' असं ट्वीट ए. आर रेहमान याने केले आहे. 






अक्षय कुमारनं ट्वीटमध्ये लिहिले, ' संगीत क्षेत्रातील आणखी तारा निखळला. बप्पीदा तुम्ही आम्हाला तुमच्या गाण्यांमुळे नेहमी आनंदी केले, त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. ओमशांती'






अभिनेता अजय देवगणनं देखील ट्वीट केलं आहे






इतर महत्त्वाच्या बातम्या:


PM Modi on Bappi Lahiri : 'जिंदादिल बप्पी लाहिरींच्या निधनानं दु:खी झालोय'; आठवण शेअर करत पंतप्रधान मोदींच्या भावना


PHOTO : 'सोन्या'सारखा माणूस गेला! अलोकेश लाहिरी ते लाडके 'बप्पीदा'; जीवनप्रवास कसा होता?


Remembering Bappi Lahiri : बप्पी लाहिरी यांचं निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास