SS Rajamouli Confirms Casting In Mahabharat: बाहुबली (Bahubali) फेम साऊथचे (South Director) प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli), यांनी कोणत्याही प्रोजेक्टची घोषणा केली की, संपूर्ण देशाच्या नजरा त्यांच्यावर खिळतात. अशातच एसएस राजामौली यांनी काही दिवसांपूर्वीच 'महाभारत' (Mahabharat) रुपेरी पडद्यावर साकारणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण, राजामौलींच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये कोण झळकणार? याबाबत मात्र, कमालीची गुप्तता पाळली गेली होती. त्यामुळे राजामौली 'महाभारत'मध्ये कोणाला संधी देणार? याबाबत सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली होती. अशातच आता, राजामौली यांनी त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 'महाभारत'मध्ये कोण झळकणार याचा खुलासा केला आहे. 

'महाभारत' हा एक असा विषय आहे, ज्यावर अनेक लोक चित्रपट बनवू इच्छितात. बीआर चोप्रा यांनी या महाकाव्यावर एक मालिकाही बनवली आहे, जी सुपरहिट झाली. आता 'बाहुबली' आणि 'आरआरआर' सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनाही महाभारतावर चित्रपट बनवायचा आहे. हा त्याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. राजामौली यांनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टच्या कास्टिंगबाबत एक मोठी घोषणा केली आहे. तेव्हापासूनच चाहते राजामौलींच्या 'महाभारत'बद्दल आणखी उत्सुक झाले आहेत.

राजामौली यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये कोण झळकणार? 

दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी साऊथचा दमदार अभिनेता नानी (South Actor Nani) यांच्या आगामी 'हिट: द थर्ड केस' या चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी, दिग्दर्शकानं त्यांच्या 'महाभारत' या आगामी प्रोजेक्टबाबत  एक मोठी अपडेट शेअर केली. खरंतर, कार्यक्रमादरम्यान, कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक सुमा कनकला यांनी राजामौली यांना महाभारताच्या कास्टिंगबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना, राजामौली यांनी पुष्टी केली की, अभिनेता नानी महाभारत मध्ये झळकणार आहे. आतापर्यंत फक्त नानीची कास्टिंग झाल्याचं राजामौली यांनी बोलताना सांगितलं. 

 राजामौली 'SSMB 29' च्या शूटिंगमध्ये व्यस्त 

सध्या राजामौली महेश बाबूसोबत 'एसएसएमबी 29' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान, जेव्हा राजामौली यांना 'एसएसएमबी 29' बद्दल काही अपडेट देण्यास सांगितलं, त्यावेळी राजामौली यांनी काहीही बोलणं टाळलं. 'SSMB 29' मध्ये महेश बाबूसोबत अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन देखील झळकणार आहेत. सध्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे, त्यामुळे चित्रपटाबद्दल अद्याप कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाही.

'हिट 3' 1 मे रोजी रिलीज होणार 

नानीच्या 'हिट 3' बद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक शैलेश कोलानू दिग्दर्शित या चित्रपटात नानीसोबत अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Director Shameless Demand To Actress: 'कपडे काढ आणि इनरवेअरमध्ये माझ्यासमोर येऊन बस...'; प्रसिद्ध दिग्दर्शकाची घाणेरडी मागणी, अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा