Shani Transit 2025: हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना कर्माचे फळ देणारी देवता म्हटले जाते. जे माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात, नुकतेच 29 मार्च 2025 या दिवशी शनिने मीन राशीत प्रवेश केला, ज्याचा परिणाम अनेकांवर होताना दिसत आहे. आता एप्रिलच्या शेवटच्या दिवसात म्हणजेच आज कर्मदाता शनि आपले नक्षत्र बदलत आहे. ज्यामुळे 3 राशींचा सुवर्ण काळ सुरू होणार आहे. जाणून घेऊया त्या 3 भाग्याशाली राशी कोणत्या आहेत?

शनि स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश, कोणाचं भाग्य चमकणार?

तसं पाहायला गेलं तर शनि ग्रह वेळोवेळी आपली राशी आणि नक्षत्र बदलत असतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि ग्रह आपली राशी आणि नक्षत्र सर्वात कमी वेगाने बदलतात. ज्योतिषशास्त्रानुसार 29 मार्च 2025 रोजी शनीने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला.  ज्यानंतर शनि आता एप्रिलच्या शेवटच्या काळात नक्षत्र बदलणार आहे. वैदिक पंचांगानुसार 28 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7:52 वाजता शनि उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. याचाच अर्थ शनि स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार  शनिने नक्षत्र परिवर्तन केल्यानंतर कोणत्या 3 राशींचे भाग्य चमकू शकते? जाणून घ्या..

मिथुन

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिच्या नक्षत्र बदलाचा फायदा मिथुन राशीच्या लोकांना जास्त होईल, शनीच्या राशीतील बदल फायदेशीर ठरेल. तुमची मनातील इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे सहकार्य मिळेल. तुम्ही गुंतवणुकीचा विचार करू शकता. व्यवसायासाठी परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. तुम्ही तुमच्या मुलांकडून चांगली बातमी ऐकू शकता. नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. जुने मित्र भेटू शकतात.

मकर

ज्योतिषशास्त्रानुसार, उत्तराभाद्रपद नक्षत्रात शनीचे संक्रमण मकर राशीसाठी फायदेशीर ठरेल. कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते. मान-सन्मान वाढू शकतो. बिघडलेली कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. धार्मिक सहलीला जाता येईल. 

कुंभ

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील. आर्थिक स्थिती सुधारू शकते. उत्तराभाद्रपद नक्षत्रात शनीचे संक्रमण अतिशय शुभ राहील. बिघडलेली कामे होऊ शकतात.  धर्माशी संबंधित कामांमध्ये रुची वाढेल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील. आत्मविश्वास वाढेल. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते. व्यवसाय वाढवण्यासाठी केलेल्या योजना फलदायी ठरतील.

हेही वाचा :

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी महिलांनी 'या' रंगाची साडी नेसू नये! कोणता रंग शुभ? कोणती कामं टाळाल? सर्व माहिती एका क्लिकवर...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)