Astrology Panchang Yog 28 April 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस सोमवार आहे. आजचा दिवस भगवान भोलेनाथाला समर्पित आहे. आज दिवसाचा प्रमुख ग्रह चंद्र आहे, जो मेष राशीत सूर्यासोबत संयोगाने भ्रमण करत आहे. तर आज वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. आज चंद्र मेष राशीत असल्यामुळे अनेक दुर्मिळ आणि शुभ योग तयार होत आहेत. सोबत आज मीन राशीमध्ये बुध आणि शुक्राचा संयोग आहे, त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. आणि यासोबतच आज भरणी नक्षत्रासोबत आयुष्मान योगाचा योगायोग आहे. तसेच आज शनि आणि गुरूचा नक्षत्र परिवर्तन योगही तयार होत आहे, त्यामुळे भगवान शिवाच्या कृपेने आजचा दिवस 5 राशींसाठी खूप भाग्यशाली असेल. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या भाग्यशाली राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आज उत्तम दिवस आहे, सोमवारी मनातील इच्छा पूर्ण होण्याचा दिवस आहे. संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होईल. प्रेम जीवनात उत्साह राहील. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. तुमचे काम वेळेवर पूर्ण होईल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतो. आज तुमच्या प्रामाणिक मेहनतीचा पुरेपूर फायदा मिळेल. आज तुमचे शत्रू तुमचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू शकणार नाहीत. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही आज नवीन उंची गाठाल.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली ठरणार आहे, आज तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ होऊ शकतात. धनलाभाचे संकेत दिसत आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होणार. आज तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. कुटुंबात आज प्रेमाचे वातावरण असेल. जोडीदारासोबत उत्साह राहील. कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याची योजना आखू शकता.रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आज सोमवार अपेक्षेपेक्षा जास्त फायदेशीर असणार आहे. नोकरदार लोकांसाठी उद्याचा दिवस चांगला जाणार आहे. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. आत्मविश्वास वाढेल. उद्या तुमचे खर्च कमी होतील. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या काही घरगुती समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकेल. परदेशाशी संबंधित नोकरी करणाऱ्यांना फायदा होईल. अभ्यास, प्रवास किंवा व्यवसाय इत्यादींसाठी परदेशात जाण्याच्या प्रयत्नात येणाऱ्या लोकांचे अडथळे दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंद राहील. जोडीदाराशी संबंध मधुर होतील. 

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार शुभ असणार आहे. भगवान शिवाच्या कृपेने आज तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. नोकरदार लोकांनाही इच्छित काम मिळू शकते, सरकारी कामाशी संबंधित लोकांना अतिरिक्त लाभ मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. व्यवसायात सुरू असलेल्या कोणत्याही समस्येवर तोडगा निघू शकेल. बाजारात अडकलेला पैसा अनपेक्षितपणे परत येईल. आज तुमचे मन प्रसन्न राहील कारण तुमच्या योजना यशस्वी होतील. कौटुंबिक सदस्यासोबत सुरू असलेले मतभेद मिटतील. लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी आणि आनंदी राहील.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार हा शुभ दिवस असणार आहे. आज तुम्हाला आर्थिक समस्यांपासून आराम मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मुलांसोबत चांगला वेळ जाईल. आज तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल, जर तुम्ही कठोर परिश्रम कराल. भाग्य तुमच्यावर कृपा करेल. स्थावर मालमत्तेशी संबंधित लोकांना विशेष यश मिळू शकते. विद्यार्थ्यांना आज आशेचा किरण दिसू शकतो. अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल.पाहुणे मंडळी घरी येऊ शकते. तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते. जोडीदारासोबत संबंध अधिक घट्ट होतील. 

हेही वाचा :

Shani Transit 2025: आजची 28 एप्रिल तारीख 'या' 3 राशींसाठी नशीब पालटणारी! शनि नक्षत्र बदलणार, गोल्डन टाईम सुरू होतोय..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)