Bala Box Office: 'बाला'ची घोडदौड सुरुच; 4 दिवसांत 50 कोटींचा आकडा पार
एबीपी माझा वेब टीम | 12 Nov 2019 12:56 PM (IST)
एकामागून एक हिट चित्रपट देणाऱ्या आयुष्मान खुरानाचा 'बाला' हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवरही यशस्वी होताना दिसत आहे. बालाने 4 दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार केला आहे.
मुंबई : आयुष्मान खुरानाची मुख्य भूमिका असलेला 'बाला' या चित्रपटाची सलग चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरू आहे. अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने 50 कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. लवकरच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये जाण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या कमाईचा विचार केला तर, सोमवारी कामाचा दिवस असूनही बालाने 8.26 कोटींची कमाई केली. ड्रिम गर्लच्या तुलनेत या चित्रपटाने चांगले प्रदर्शन केले आहे. ड्रिम गर्लने चौथ्या दिवशी 7.43 कोटींचा गल्ला जमावला होता. बालाने पहिल्या दिवशी 10.15 कोटी, दुसऱ्या दिवशी 15.73 तर रविवारी हा आकडा वाढून 18.7 कोटी असा वाढत गेलेला पाहायला मिळाला. चित्रपटाने 4 दिवसांत एकूण 52.21 कोटी इतका गल्ला जमावला आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे. ट्रेंड्सचा विचार केला तर मंगळवारी कार्तिक पौर्णिमे निमित्त सुट्टी असल्याने याचा फायदा चित्रपटा होईल. चित्रपटाच्या परिक्षणाचा विचार केला तर एबीपी न्यूजने या चित्रपटाला 4 स्टार दिले आहेत. 'स्त्री' या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक यांनी बालाचं दिग्दर्शन केले आहे. शाळकरी वयापासून केसांची स्टाईल करणाऱ्या मुलाचे ऐन तारुण्यात केसगळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते. ही बालाची कथा आहे. या चित्रपटात आयुष्मान सोबत भूमी पेडनेकर, यामी गौतम, सीमा पावा, सौरभ शुक्ला आणि जावेद जाफरी यांच्याबी भूमिका आहेत. संबधित बातम्या : दोन दिवसात 'बाला' चित्रपटाने कमवले इतके कोटी Ayodhya Verdict: मशिदीसाठी मिळणाऱ्या जागेवर शाळा बांधावी - सलीम खान