Ayesha Khan Reveals She Cried During Shararat Song Shoot: आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर या चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटात रणवीर सिंहसह सारा अर्जून,  अक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त आणि अर्जून रामपाल यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. स्टोरीपासून गाण्यांपर्यंत या चित्रपटातील प्रत्येक सीन हिट ठरला. चित्रपटातील 'शरारत' या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या हिट गाण्यामध्ये आयशा खान आणि क्रिस्टर डिसूझाने भन्नाट नृत्य सादर केले होते.  जास्मिन सँडलास  आणि मधुबंती बागची यांनी हे सुंदर गाणं गायलंय.  आयशा खानने या गाण्याबाबत एक किस्सा शेअर केला.   

Continues below advertisement

'शरारत' या गाण्याचे शूटिंग करतानाचा किस्सा सांगताना आयशा म्हणाली, 'दोन दिवसांचे शूटिंग होते. माझी मासिक पाळी सुरू होती.  या काळात आपल्याला ब्लोटिंगचा त्रास होतो. मन काहीसं उदास राहतं.  तुम्ही तुमच्या सर्वोत्तम स्थितीत नसता. पण माझ्यासाठी हा मोठा दिवस होता.  दोन दिवस खूप काम होते. या दिवसांत मला सेटवर नेमकं चाललंय काय? याची कल्पना नव्हती', असं  आयशानं मुलाखतीत सांगितलं.

 

Continues below advertisement

"या काळात क्रिस्टल आणि माझ्याकडे सेटवर अजिबात वेळ नव्हता. या दोन दिवसांत लग्नाचा सीन देखील शूट करायचा होता. आमच्याकडे खूप काम होते.  आम्ही खूप थकलो होतो. इतके नाचून आमची हाडे दुखत होती. मी तेव्हा खूप भावनिक झाले होते.  मूड स्विंग्स देखील झाले होते. कारण माझे पीरियड्स सुरू होते. मी स्वत:वर नियंत्रण ठेवू शकले नाही. तेव्हा मी रडले. ते आनंदाचे अश्रू होते", असं आयशाने सांगितलं.

क्रिस्टरबाबत बोलताना आयशा म्हणाली, "क्रिस्टल आणि मी एकत्र खूप छान वेळ घालवला होता.  खरंतर ती माझी सिनिअर आहे.  तिनं माझ्यासोबत खूप काम केले आहे.  जेव्हा मला सांगण्यात आलं की, क्रिस्टलसोबत गाणं शूट करायचं आहे, तेव्हा वाटलं की ती चूक झाल्यावर माझ्यावर रागवेल. पण क्रिस्टल स्वीटहार्ट आहे", असं अभिनेत्री आयशा म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सलमान खानच्या चाहत्यांसाठी बिग न्यूज; आगामी चित्रपटाबाबत मोठी अपडेट, 'बॅटल ऑफ गलवान' कधी रिलीज होणार?