Award Winning Director Jafar Panahi Prison Sentence: एका दिग्गज दिग्दर्शकाला (Director) एका वर्षासाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, या सुप्रसिद्ध जागतिक दर्जाच्या दिग्दर्शकाला एका पुरस्कारानं सन्मानित केलं जात होतं. त्याचवेळी त्याला एका न्यायालयानं तुरुंगवासाची शिक्षा (Prison Sentence) सुनावली आहे. इराणच्या (Iran) एका न्यायालयानं प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक जाफर पनाही (Film Director Jafar Panahi) यांना एक वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांना राजवटीविरुद्ध प्रचार कार्यात सहभागी झाल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे.
पनाही यांचे वकील मुस्तफा निली यांनी ट्विटरवर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलंय की, न्यायालयानं त्यांच्या अशिलाला दोन वर्षांसाठी इराण सोडून जाण्यास मनाई केली आहे. निली यांनी सांगितलं की, पनाही आता या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.
न्यू यॉर्कमध्ये पुरस्कार स्विकारत असतानाच इराणमध्ये तुरंगवासाची शिक्षा
पनाही यांना शिक्षा अशावेळी सुनावण्यात आली, जेव्हा त्यांना न्यूयॉर्कमध्ये आयोजित एनुअल गोथम अवॉर्ड फेस्टिवलमध्ये 'इट वॉज जस्ट ऐन एक्सिडेंट' सिनेमासाठी तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यांना न्यूयॉर्कमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांसह इतर कॅटेगरीत तीन पुरस्कार मिळाले. 'इट वॉज जस्ट ऐन एक्सिडेंट' सिनेमानं या वर्षीच्या कान्स मोहोत्सवातही पाल्मे डी'ओर जिंकलेला.
यापूर्वीही तुरुंगात जाऊन आलेत दिग्दर्शक पनाही
दिग्दर्शक जाफर पनाही यांनी त्यांच्याच देशानं त्यांना सुनावलेल्या शिक्षेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता शिक्षा सुनावल्यानंतर पनाही आपल्या मायदेशी परतणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 65 वर्षीय जागतिक ख्यातीचे दिग्दर्शक जाफर पनाही यापूर्वीही दोनदा तुरुंगात जाऊन आलेत.
नजरकैदेत असूनही फिल्म बनवणं सुरूच ठेवलं
दिग्दर्शक जाफर पनाही म्हणजे, जागतिक ख्यातीच्या सर्वात दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक. गेल्या 20 वर्षांत इराणच्या पोलिसांकडून कित्येकदा तरी अटक करण्यात आलेले. देशाबाहेर प्रवास करायला बंदी घालूही पनाही यांनी फिल्म्स करणं सुरूच ठेवलेलं. फ्रान्सनं पनाही दिग्दर्शित 'इट वॉज जस्ट ऐन एक्सिडेंट' सिनेमा अकॅडमी अवॉर्डमध्ये पाठवलाय. त्यांनी युरोपियन चित्रपट महोत्सवांमध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत आणि 1995 मध्ये त्यांचा पहिला चित्रपट, 'द व्हाईट बलून', याला कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
जगभरात ख्याती असूनही मायदेशानंच का सुनावलीय शिक्षा?
द गार्डियनमधील एका वृत्तानुसार, पनाही यांना यापूर्वी व्यवस्थेविरुद्ध प्रचार केल्याबद्दल सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती, पण जामिनावर सुटण्यापूर्वी त्यानं फक्त दोन महिन्यांसाठी तुरुंगवास भोगला होता. 20 वर्ष चित्रपट निर्मितीवर बंदी घातल्यानंतर एका वर्षानंतर, त्यानं केकमध्ये लपवलेल्या फ्लॅश ड्राइव्हवर 'दिस इज नॉट अ फिल्म' नावाचा एक माहितीपट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाठवला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :