मुंबई : भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे (Gauri Garje Death Case) यांनी वरळीच्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. पती अनंत गर्जेचे अन्य महिलेसोबतचे संबंध असल्याचे उघड झाल्याने अनंतसह त्याचे कुटुंबीय गौरीला (Gauri Garje Death Case) त्रास देत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याचबरोबर गौरीने (Gauri Garje Death Case) आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचे आरोप देखील गौरी पालवेच्या माहेरच्या सदस्यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिस सखोल तपास करत आहेत, तर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात अपडेट समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीचा जबाब नोंदवला आहे.(Gauri Garje Death Case) 

Continues below advertisement

डॉ. गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणाने राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काल (मंगळवारी, ता २) कोर्टात सुनावणी पार पडली. कोर्टाने अनंत गर्जेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनंत गर्जेची मानसशास्त्रीय तपासणी होणार असून पोलीस वैज्ञानिक तज्ञांच्या माध्यमातून तपास करणार असल्याची माहिती आहे. अनंत गर्जेची पॉलीग्राफ टेस्ट करणे आवश्यक असल्याची पोलिसांनी कोर्टात माहिती दिली आहे. पुन्हा पोलीस कोठडी देण्याचे अधिकार अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी द्या अशी पोलिसांनी मागणी केली होती. यावेळी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला याची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीचा जबाब घेतल्याची माहिती दिली आहे. यासंबंधीचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

Gauri Garje Case: अनंत गर्जेच्या प्रेयसीने पोलिसांना काय जबाब दिला? 

पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, एफआयरमध्ये नाव नमूद असलेल्या अनंत गर्जे यांच्या जुन्या प्रेयसीचा जबाब वरळी पोलिसांनी नोंदवला आहे. 2022 पासून माझा आणि अनंतचा काहीही सबंध नसल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले आहे. तसेच गौरीला घरी सापडलेल्या कागदपत्रांबद्दल आपल्याला काहीही कल्पना नाही, असंही तिने म्हटलं आहे.

Continues below advertisement

Gauri Garje Case: अनंतच्या शरीरावर ताज्या स्वरुपाच्या 28 जखमा

त्याचबरोबर अनंतच्या शरीरावर 28 जखमा आहेत. या जखमा ताज्या आहेत. तसेच गौरी पालवे आणि अनंत यांच्यात झटापटी झाल्याच्या जखमा असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांकडून कोर्टात याबाबत माहिती देण्यात आली आहे. अनंतची पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे. तसेच मानसशास्त्रीय तपास केला जाणार आहे. तसेच तज्ज्ञांच्या माध्यातून या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला जाणार आहे.

Gauri Garje Case: अनंत गर्जेने आपलं डोकं भिंतीवर आपटण्याचा प्रयत्न केला 

गौरी पालवेंचा मृत्यू झाल्याची माहिती समजल्यानंतर अनंत गर्जेने (Gauri Garje Death Case) आपलं डोकं भिंतीवर आपटण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून त्याला डोक्याला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांना याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं आहे. त्याचबरोबर अनंतने खिडकीतून घरात प्रवेश केला होता. त्यामुळे घराच्या खिडकीला ज्या व्यक्तीने जाळ्या बसवल्या त्यालाच जाळीमधून आतमध्ये प्रवेश करता येतो का? याचं प्रात्याक्षिक देखील दाखवायला सांगण्यात आलं होतं. (Gauri Garje Death Case)