Sunita Ahuja on Govinda viral video: अभिनेता गोविंदा (Govinda) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  तो आपली को-स्टार कोमल रानी (Komal Rani) स्वर्णकारसोबत  कथित अफेअर प्रकरणामुळे चर्चेत आहे. तो नुकतंच कोमलसोबत मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) स्पॉट झाला होता.  याचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल (Social Media) झाला. दरम्यान, हे पाहून गोविंदाची पत्नी, सुनीता आहुजाने अभिनेत्यावर टीका केली. पापाराझींशी बोलताना तिने गोविंदावर टीका केली आहे.  सुनीता म्हणाला, 'तो  त्याच्या लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरत आहे. त्याला लाज वाटायला हवी', असं तिनं म्हटलं आहे.  सध्या सुनीताचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

गोविंदा सध्या आपला आगामी सिनेमा 'रुपा'मुळे चर्चेत आहे.  या सिनेमात त्याच्यासोबत  कोमल झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता कोमलसोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता.   तो पुन्हा एकदा कोमलसोबत स्पॉट झाला आहे. नुकतंच पापाराझींनी यावर सुनीताची प्रतिक्रिया घेतली.  पापाराझींनी सुनीताला,  'गोविंदा सर, या सिनेमाचा प्रमोशन करत आहेत. ते पुन्हा एकदा कोमल रानीसोबत स्पॉट झाले आहेत', असं म्हटले. यावर सुनीताने तिखट शब्दांत गोविंदावर टीका करत प्रतिक्रिया दिली.

सुनीताचा गोविंदाच्या 'त्या' व्हिडीओवर तिखट शब्दांत वार (Sunita Ahuja Slams Govinda Over His Viral Video)

 

Continues below advertisement

यावर सुनीता म्हणाली, 'सिनेमा तरी तयार झाला पाहिजे ना... सिनेमा तयार झाल्यानंतर प्रोमोशन होतो.   प्रमोशनशिवाय....आता बोलायचं तरी काय?  तो त्याच्या लेकीच्या वयाच्या मुलीला घेऊन फिरत आहे.  त्याला लाज वाटायला हवी आहे.  ही खूप वाईट गोष्ट आहे. त्याचं डोकं फिरलं आहे'. असं सुनीता गोविंदावर टीका करत म्हणाली.  सुनीता इतक्यावरच थांबली नाही, तिने कोमल रानीवर टीकेचे तोफ डागले.   तसेच तिच्या स्टँडर्डचीही खिल्ली उडवली.  

 सुनीता म्हणाली, 'काहीतरी स्टँडर्ड असायला हवा. तुमचा शुगर डॅडी इतका श्रीमंत आहे. नीट, चांगले कपडे तरी घाला.  आम्हाला बघा,  आम्ही कसे स्टाइलमध्ये राहतो', असं सुनीता म्हणाली. सध्या सुनीताची हा व्हिडीओ  सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुनीता आणि गोविंदा यांच्यात मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे.  सुनीताने आतापर्यंत गोविंदावर अनेक आरोप केले आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?