Awarapan 2 Box Office Collection: नितिन कक्कर दिग्दर्शित रोमाँटिक अॅक्शन ड्रामा फिल्म  'आवारापन 2' (Awarapan 2) या सिनेमाची सध्या प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. अभिनेता इम्रान हाश्मी अभिनीत या सिनेमाने अवघ्या काही दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.  प्रदर्शनाच्या अवघ्या  एका आठवड्यातच या सिनेमाने आपल्या बजेटच्या दुप्पट कमाई करुन सुपरहिटचा टॅग मिळवला आहे. 14 ऑगस्ट रोजी 'आवारापन 2' (Box Office Collection) हा सिनेमा रिलीज झाला होता.  हा चित्रपट रिलीज होऊन 8 दिवस पूर्ण झाली आहेत. आता या सिनेमाने 8 व्या दिवशी, म्हणजेच दुसऱ्या शुक्रवारी किती कोटींचं कलेक्शन केलं? जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

'आवारापन 2' या सिनेमाने अवघ्या 8 दिवसांत  किती कोटी कमावले? (Awarapan 2 day 8 box office collection)

इम्रान हाश्मी अभिनीत 'आवारापन 2' हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. सुरुवातीला या सिनेमाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला.  'आवारापन' या कल्ट क्लासिक सिनेमाचा हा सिक्वेल असून,  'आवारापन' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळालेला नव्हता.  परंतु, टेलिव्हिजनवर रिलीज होताच, या सिनेमाला प्रेक्षकांकडून पसंती मिळाली. दरम्यान, या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.   इम्रान हाश्मीच्या कारकिर्दीतील हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. जर 'आवारापन 2' या सिनेमाची कामगिरी अशीच चांगली राहिली, तर तो ब्लॉकबस्टर ठरु शकतो. 

'आवारापन 2' या सिनेमाच्या कमाईबाबत बोलायचं झाल्यास,  'आवारापन 2' या सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 22 कोटी रुपयांची कमाई केली होती. या सिनेमाने पहिल्या आठवड्यात  113.50 कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्याच आठवड्यात या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा ओलांडला.  सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 'आवारापन 2' या सिनेमाने प्रदर्शनाच्या आठवड्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शुक्रवारी  5.50 कोटी रुपयांची कमाई केली.  यामुळे 'आवारापन 2' या सिनेमाने भारतात एकूण 8 दिवसांत 119 कोटी रुपायांचे नेट कलेतक्शन केलं आहे.

Continues below advertisement

'आवारापन 2' या सिनेमाने प्रदर्शनाच्या 8 दिवसांत 119 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सध्या अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाचे  लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकण्याचे  'आवारापन 2' या सिनेमाचे लक्ष्य आहे. यासाठी 'आवारापन 2' या सिनेमाला  आणखी 8 कोटींची कमाई करणं आवश्यक आहे.  दरम्यान, हा सिनेमा लवकरच हा टप्पा ओलांडेल. काही दिवसांत यशचा 'टॉक्सिक' हा सिनेमा रिलीज होणार आहे.  'टॉक्सिक' प्रदर्शित होईपर्यंत, 'आवारापन 2' ला कोणत्याही अडथळ्याशिवाय  मोठी कमाई करण्याची संधी आहे. 'आवारापन 2' हा सिनेमा 200 कोटी रुपयांची कमाई करेल का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO