Maharashtra Epstein Files Movie Teaser: महाराष्ट्रासह देशाच्या समाज मनाला हादरवून सोडणाऱ्या आणि राजकीय वर्तुळातहीएकच खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर (Ashok Kharat Case) आधारित 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' (Maharashtra Epstein Files) या नव्या मराठी चित्रपटाची (Marathi Movie) काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. अशातच महाराष्ट्रात प्रचंड गाजलेल्या आणिराज्याच्या राजकीय (Maharashtra Politics) वर्तुळात भूकंप निर्माण करणाऱ्या खरात प्रकरणावर आधारित या सिनेमाचा टीझर (Maharashtra Epstein Files Movie Teaser) प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्यायाटीझरची (Teaser) सोशल मीडियावर जोरदारचर्चाअसूनसत्य घटनांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या सिनेमात काही वास्तवातील व्यक्तिरेखाही दिसणार आहेत. तरयातप्रामुख्याने दीपाली सय्यद (Dipali Sayyed) मुख्य भूमिका साकारत असून अभिनेते उदय टिकेकर (Uday Tikekar) यांचा देखील यात समावेश आहे.येत्या 2 ऑक्टोबर 2026 रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याचीमाहितीआहे.
Maharashtra Epstein Files Movie Teaser: 'कोणाच्या डोक्यावर बॉम्ब लागणार...?' प्रेक्षकांचीउत्कंठाशिगेला
आनंदी पिक्चर्स अमरावती आणि सचिन रोरे पाटीलसह फ्लेमिंगो क्रिएशन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत सिनेमाची निर्मिती करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देवेंद्र भट, सुर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे करीत आहेत. दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत दिग्दर्शन करीत आहेत. सध्या या सिनेमाचीसर्वत्रजोरदारचर्चारंगलीअसूनयेत्या 2 ऑक्टोबर 2026 रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याचीमाहितीआहे. सध्यासोशलमीडियावर 'कोणाच्या डोक्यावर बॉम्ब लागणार...?', असाआशयलिहतयाबहुचर्चित सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. 2 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा नुकताच फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. त्या पाठोपाठनव्या टीझरनेप्रेक्षकांचीउत्कंठाअधिकवाढवलीआहे. टीझरमध्ये दीपाली सय्यद यांचा लूक पाहताक्षणी लक्ष वेधून घेतोय. त्यांची व्यक्तिरेखा या सिनेमात अतिशय महत्वाची असून या रुपात पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या रुपात दीपाली यांच्या अभिनयाचा कस लागणार आहे. दीपाली सय्यद यांच्यासह फर्स्ट लूक मध्ये अभिनेते उदय टिकेकर यांचा देखील समावेश आहे.
दरम्यान, 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहीली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. डिओपी आकाश काकडे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणार असून, कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर करणार आहेत. वेशभूषा आकांक्षा गांधी यांची असून, सचिन घनवट या चित्रपटाचे प्रोडक्शन हेड आहेत. तसेच नेहा घोडके प्रॉडकशन कंट्रोलर म्हणून काम पाहणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
