Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: छत्रपती संभाजीनगर येथील तिसगाव परिसरात असणाऱ्या एका डोंगरावरुन उडी मारुन आत्महत्या (Chhatrapati Sambhaji Nagar News) करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलाला वाचवताना त्याच्या आई-वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल (21 ऑगस्ट) घडली. कुणाल मुरलीधर चांदवडे, मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी मृतांची नावे आहेत. (Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Marathi News)
कुणालचा वडिलांसोबत वाद झाला होता. त्यानंतर तो सकाळी सुमारे 10 वाजता खवड्या डोंगरावर गेला. त्याचा हेतू टोकाचं पाऊल उचलण्याचा असल्याचं समोर आल्यानंतर आई-वडील त्याला समजावण्यासाठी डोंगरावर पोहोचले. कुणालला समजावण्याचे प्रयत्न सुमारे तीन तास सुरू होते. पोलिस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी खाली जाळी लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र कुणाल वारंवार आपली जागा बदलत होता. अखेर कुणालने डोंगरावरून उडी घेतली. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर मुलगा आणि पती खाली पडल्याचे पाहून आई संगीता यांचाही दुर्दैवी अंत झाला.
पोलिसांनी दिली चक्रावून टाकणारी माहिती- (Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain)
सदर घटनेवर पोलीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, घटनेबाबत सकाळी फोन आला. फोन आल्यानंतर आमचे 112 चे कर्मचारी सुरेश भिसे आणि त्यांच्यासोबतचे अंमलदार त्या ठिकाणी खवल्या डोंगरावर एक इसम त्या ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. 11 वाजता 112 ला कॉल आल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी जे 112 चे कर्मचारी गेले आणि त्यानंतर बाकीचे काही कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. तर त्या ठिकाणी एक व्यक्ती त्या ठिकाणी ती डोंगराच्या कडेला खवल्या डोंगराच्या कडेला आत्महत्या करण्यासाठी उभी असल्याची माहिती समजली. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आणि त्याला विनंती करत होते की, बाबा तू आत्महत्या करू नको. यादरम्यान, काही कर्मचाऱ्यांनी लगेच तात्काळ फायर ब्रिगेडला बोलवले. फायर ब्रिगेड तात्काळ त्या ठिकाणी आली आणि डोंगराच्या पायथ्याशी त्यांनी ती जाळी लावली की जर तो पडला तर त्या जाळीमध्ये तो अडकेल आणि त्याचा जीव वाचेल, अशा पद्धतीने प्रयत्न केले. परंतु तो पोलिसांना आणि खालच्या फायर ब्रिगेडला चकमा देऊन वारंवार त्या ठिकाणी जागा बदलायचा प्रयत्न करत होता. त्यामुळे फायर ब्रिगेडलाही वारंवार जागा बदलावी लागत होती. आमचे लोक समजवायचा प्रयत्न करत होते. त्याची आईही समोर बसून त्याला समजावत होती. मुलाचे मनपरिवर्तनही होत होते. मात्र त्या गर्दीमधून वडील आहे, ते वडील होते, हे पोलिसांना माहिती नव्हते. वडील अचानक डोंगरावर आले आणि त्याला धरून ओढण्याचा प्रयत्न केला, म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तोल गेल्यामुळे मुलासह त्यांचाही खाली पडून मृत्यू झाला. आईने हे बघताच तिनेही त्यांच्यामागून तात्काळ डोंगरावरुन उडी मारली आणि तिघांचाही या घटनेत मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नेमकं प्रकरण काय? (Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain)
कुणालचा वडिलांसोबत वाद झाला होता. Apple कंपनीच्या आयफोन 15 मोबाईलसाठी हट्टाला पेटलेला मुलगा जीव देण्यासाठी खवड्या डोंगरावर पोहोचला. त्यानंतर तो सकाळी सुमारे 10 वाजता खवड्या डोंगरावर गेला. त्याचा हेतू टोकाचं पाऊल उचलण्याचा असल्याचं समोर आल्यानंतर आई-वडील त्याला समजावण्यासाठी डोंगरावर पोहोचले. कुणालला समजावण्याचे प्रयत्न सुमारे तीन तास सुरू होते. पोलिस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी खाली जाळी लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र कुणाल वारंवार आपली जागा बदलत होता. अखेर कुणालने डोंगरावरून उडी घेतली. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर मुलगा आणि पती खाली पडल्याचे पाहून आई संगीता यांचाही दुर्दैवी अंत झाला. तिघांचाही डोंगराच्या खाली पडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. तिघांचे मृतदेह बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
