Met Gala 2022 : सेलिब्रिटींच्या हटके फॅशन सेन्समुळे ‘मेट गाला’ दरवर्षी प्रचंड चर्चेत असतो. 2022च्या मेट गाला इव्हेंटमध्येही कलाकारांचा असाच खास अंदाज पाहायला मिळाला. पण, या सगळ्याच्या दरम्यान, लोकप्रिय इंटरनेट सेन्सेशन एम्मा चेंबरलेनने (Emma Chamberlain) देखील मेट गाला 2022मध्ये आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. एम्मा ‘मेट गाला’मध्ये ऐतिहासिक नेकपीस परिधान करून आली होती, ज्यामुल्र ती आता प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.


‘मेट गाला 2022’मध्ये एम्मा डिझायनर लुई व्हिटॉनच्या पोशाखात दिसली होती. फुल स्लीव्ह क्रॉप टॉप आणि पांढऱ्या स्कर्टमध्ये एम्मा खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिने गळ्यात चोकर स्टाईल सुंदर नेकपीस घातला होता. मात्र आता सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, एम्माने परिधान केलेला नेकपीस महाराजा पटियाला भूपिंदर सिंह यांचा पारंपरिक चोकरपीस होता. यामुळेच, आता सोशल मीडियावर एम्माच्या लूकपेक्षा अधिक तिच्या गळ्यातील चोकरपीसची चर्चा होत आहे.


एम्माचे हे फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर, आता लोक तिला सतत ट्रोल करत आहेत. एम्माने घातलेला नेकपीस भारतातून चोरीला गेल्याचेही काही लोकांचे म्हणणे आहे आहे.





जाणून घ्या या नेकपीसचा इतिहास!


पटियालाच्या महाराजांकडे डी बीमर्स हा जगातील सातवा सर्वात मोठा हिरा होता, जो त्यांच्या हाराच्या मध्यभागी जडवण्यात आला होता. कार्टियर या प्रसिद्ध कंपनीकडून त्यांनी तो विकत घेतला होता. 1928 मध्ये महाराजांनी कंपनीला हार बनवण्याचे काम दिले होते, असा दावा केला जाता आहे. 1948मध्ये महाराजांचा मुलगा यादविंदर सिंग याने तो हार घातल्यानंतर, अचानक त्याच्या गळ्यातून हा हार गायब झाला होता.


लंडनमधील कार्टियर प्रतिनिधी एरिक नुसबॉम यांना 50 वर्षांनंतर हार परत मिळाला. त्या वेळी, या चोकर हारात डी बिअरचे दगड आणि बर्मी माणिक नव्हते. त्यामुळे कार्टियरने डी बीमर्स आणि इतर मूळ खड्यांशिवाय हा नेकपीस पुन्हा एकसंध करून नव्याने बनवण्याची योजना आखली.


संबंधित बातम्या