Avadhoot Gupte Instagram Post : गायक अवधूत गुप्ते सोशल मीडियावर सक्रिय असलेले पाहायला मिळतात. (Avadhoot Gupte Instagram Post ) सध्या त्यांची अजगराबाबतची पोस्ट चर्चेत आहे. अवधूत गुप्ते बोरिवलीच्या श्रीकृष्ण नगर परिसरात राहातात. या भागात सध्या दोन मोठे अजगर पाहायला मिळाले आहेत. (Avadhoot Gupte Instagram Post ) याबाबत अवधूत गुप्ते यांनी इन्स्टाग्रामवर भाष्य केलंय.  (Avadhoot Gupte Instagram Post ) शिवाय या पोस्टमध्ये अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या परिसरातील लोकांची खासियतही सांगितली आहे. अवधूत गुप्ते या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाले आहेत? जाणून घेऊयात.. 

Continues below advertisement

अवधूत गुप्ते यांची पोस्ट जशीच्या तशी 

मुंबईतल्या घरांमध्ये भिंतीवर ‘पाल‘ दिसली तरी शेजार पाजाऱ्यांना बोलवून “ऐऽऽ!! ऊऽऽ!!” चा दंगा करणाऱ्यांनी आमच्या बोरिवलीच्या श्रीकृष्ण नगर परिसरामध्ये गेल्या दोन दिवसात मिळालेले हे दोन अजगर नक्की पाहावेत! माकडांबरोबर तर आमचे सहजीवनच. परंतु, कधी बिबट्या तर कधी अजगरासारखा पाहुणा आमच्या कॉलनीमध्ये आला, की कृष्णनगर वासियांचा उत्साह हा अक्षरशः सण-सोहळ्यासारखा असतो! अर्थात आमच्यावर संस्कारच निसर्ग प्रेमाचे. ते आमच्या घरात येत नसून, आम्हीच त्यांच्या घरात घर बांधले आहे ह्याची जाणीव प्रत्येक नगरवासीयाला कायम असते. त्यामुळे ह्या दोन अजगरांना देखील सर्पप्रेमींच्या मदतीने त्यांच्या इष्ट स्थळी पुनश्च पोहोचवण्यात आले. ही पोस्ट कुठल्याही वन अधिकाऱ्याने किंवा वनविभागाने कुठलीही कारवाई करावी यासाठी नसून, आमच्या कृष्णनगराचे कौतुक करण्यासाठी आहे. त्याचप्रमाणे कृष्ण नगर आणि आजूबाजूच्या परिसरात नव्याने विस्थापित होणाऱ्या नव्या शेजाऱ्यांचे स्वागत करत असतानाच त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यासाठी आहे. जय श्री कृष्ण नगर!! जय बोरिवली पूर्व!! (Avadhoot Gupte Instagram Post )

अवधूत गुप्ते यांची इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला असून काही सकारात्मक तर काही नकारात्मक कमेंट्स आलेल्या पाहायला मिळत आहेत. (Avadhoot Gupte Instagram Post )

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'तरुणांना लाजवेल अशी एनर्जी...', अभिनेता शाहरुख खानची पीएम मोदींसाठी खास पोस्ट; आमिरही म्हणाला...

'पीछे देखो पीछे फेम' बाल कलाकाराच्या छोट्या भावाचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन; 2023 मध्ये झालेला बहिणीचा मृत्यू