Asim Sarode On Atharva Sudame: सध्या प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) अथर्व सुदामे (Atharva Sudame) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या त्याच्यावर चोहीकडून टीकेची झोड उठवली जात आहे. पण, दुसरीकडे अथर्व सुदामेच्या समर्थनातही काहीजण पोस्ट करत आहेत. अशातच अथर्व सुदामेला ब्राम्हण महासंघानं (Brahmin Mahasangh) फैलावर घेतलं असतानाच आता नामांकीत वकील असिम सरोदे (Asim Sarode) यांनी अथर्व सुगामेच्या समर्थनात पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमधून असिम सरोदे यांनी अथर्व सुदामेनं व्हिडीओ डिलीट केल्या, ते योग्य केलं नाही, असंही म्हटलं आहे. तसेच, अथर्वने तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा. कोण काय करतंय ते बघूयात, असं म्हणत अथर्वला पाठींबा दिला आहे.  

Continues below advertisement

असिम सरोदे नेमकं काय म्हणाले? 

नामांकीत वकील असिम सरोदे यांनी अथर्व सुदामेच्या समर्थनात एक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये असिम सरोदे म्हणाले की, "अथर्व सुदामे याने घाबरून व्हिडीओ डिलीट केला हे योग्य केले नाही असे वाटले. अथर्वबाबत अनेक लोक विविध मतं मांडतात. त्याच्या व्हिडीओतील विनोदाच्या दर्जाबाबत बोलले जाते. परंतु त्यानं जे रिल्स सातत्यानं तयार केलेत, स्पर्धेच्या युगात स्वतःचा एक मार्ग तयार केला, त्याचं कौतुक करायलाच पाहिजे. त्याचे काही विनोद अनेकांना उथळ,पांचट, निरर्थक वाटले असतील पण ते अश्लील नव्हते..."

"कधी उथळ, गंभीर, गमतीदार, विचार प्रवर्तक तर कधी  सुमारही अशा वळणांवरून एखादा विषय नेमकेपणाने हाताळला जातो तेव्हा धमक्या देणाऱ्यांना घाबरून अथर्वने त्याचा अत्यंत सुंदर आणि सामाजिकता, बंधुभाव, प्रेम जपण्याचे आवाहन करणारा व्हिडीओ डिलीट करणे मला चिंताजनक वाटले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे असे टुकार हल्ले ठामपणे परतवून लावता आले पाहिजेत. तेवढयासाठी मी अथर्व सोबत आहे...", असं असिम सरोदे म्हणाले आहेत. 

Continues below advertisement

"राज ठाकरे साहेबांनी अथर्वचं जाहीर कौतुक केलं होतं, तेव्हा पासून अथर्वने अधिक जबाबदारीने अनेक विषय हाताळले असे सुद्धा दिसते. एका उत्तम व्यंगचित्रकाराने दिलेल्या कौतुकाच्या शब्दांनी अथर्वला प्रोत्साहन मिळाले. पण आता काही सुमार धर्मवादी अथर्वला धमक्या देत असतांना राज ठाकरेंनी व मनसेने अथर्वच्या सोबत उभे राहावे असे आताच माझे राज साहेबांसोबत बोलणे झाले. अथर्वने तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा. कोण काय करतंय ते बघूया.", असं असिम सरोदे म्हणाले. 

अथर्व सुदामेचा व्हिडीओ वादाचं केंद्रबिंदू का ठरतोय? 

प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यासाठी कारण ठरलंय, त्याचं एक रिला. गणेशोत्सवाच्या निमित्तानं अथर्व सुदामेनं एक रिल शेअर केलं आहे. या रिलमध्ये अथर्व सुदामे एका भाविकाच्या भूमिकेत दिसतोय. अथर्व गणेशोत्सवासाठी गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी मूर्तीकाराकडे जातो. मूर्तीकाराच्या कारखान्यात असंख्य मूर्ती असतात. त्यातली एक मूर्ती अथर्व बूक करतो. तेवढ्यात मूर्तीकाराचा मुलगा अब्बू अशी हाक मारत तिथे येतो. तेवढ्या अथर्व सुदामे आणि तो मूर्तीकार एकमेकांकडे पाहतात. तेवढ्यात मूर्तीकार अथर्वला सांगतो की, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पुढे जाऊन मूर्ती पाहू शकता... मूर्तीकाराला वाटतं की, अथर्व सुदामे मूर्ती खरेदी करेल की नाही? पण, अथर्व सुदामे तुमच्याकडूनच मूर्ती घ्यायची आहे, असं मूर्तीकाराला निक्षूण सांगतो. 

अथर्व सुदामे मूर्तीकाराशी बोलताना म्हणतो की, "माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीरखुर्माही... तसेच आपण वीट व्हावं जी वीट देवाळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील..." असा संवाद या रीलच्या शेवटी अर्थवच्या तोंडी देण्यात आला आहे. या रीलवरुन अथर्व सुदामेवर हिंदुत्वाद्यांकडून टीका होत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Atharva Sudame Apologized: 'अक्कल शिकवतोय... तुझा धंदा मर्यादित ठेव'; ट्रोलिंगनंतर अथर्व सुदामेला ब्राम्हण महासंघानंही सुनावलं, नेमकं घडलं काय?