Ganesh Chaturthi 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. काही दिवसांतच घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी लाडक्या बाप्पाचं आगमन होणार. गणेशोत्सवाची (Ganesh Chaturthi) उत्सुकता खरंतर आपल्या सर्वांनाच असते. मात्र, तरीही गणपतीच्या संदर्भात काही धार्मिक श्रद्धा आहेत ज्या आपल्याला माहितच नाहीत. अगदी त्याच पद्धतीने गणपतीच्या संदर्भातील एक प्रथा म्हणजे जेव्हा आपण गणपती घरी आणतो तेव्हा तो झाकून आणतो. मात्र, ही प्रथा का आहे याचा तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? नसेल तर याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
गणपतीची मूर्ती झाकण्यामागची धार्मिक परंपरा...
खरंतर, शहरात असो वा गावी गणपती घरी आणताना तो नेहमी झाकूनच आणावा असे आपले आजी आजोबा नेहमी बजावून सांगायचे. तर, यामागे सगुण आणि निर्गुण असे दोन तत्त्व आहेत. धार्मिक परंपरेनुसार, मूर्तीचा पुढील भाग सगुण तत्त्व म्हणजेच भौतिक स्वरुपाचा असतो. आणि मागील भाग निर्गुण तत्त्व म्हणजेच अभौतिक तत्व उत्सर्जित करतो.
गणपतीची मूर्ती झाकल्याने हे दोन्ही तत्त्व संतुलित राहतात अशी मान्यता आहे. तर गणपतीची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर मूर्तीमधील दैवत्त्व पूर्णत्वास येते असं म्हटलं जातं. तसेच, बाहेरील धूळ, वारा, पाऊस अशा घटकांपासून मूर्तीचं संरक्षण करता येते. तसेच, यामुळे मूर्तीला नजर लागत नाही अशी देखील काही भागांमध्ये मान्यता आहे. पण, याचं मुख्य कारण म्हणजे, प्राणप्रतिष्ठापना पूर्ण झाल्यानंतर मूर्तीला नकारात्मक ऊर्जेपासून बचवा करण्यासाठी मूर्ती झाकून ठेवण्याची प्रथा आहे.
तसेच, शास्त्रानुसार, जर तुम्ही यंदाच्या गणेशोत्सवाला गणपतीची स्थापना करणार असाल तर, शाडूची मूर्ती घरात आणा. तसेच, गणरायाची सोंड डाव्या बाजूला असावी. तसेच, मूर्ती विराजमान अवस्थेत असावी. तसेच, गणपतीच्या बरोबर उंदीरमामा देखील असावा. तसेच, गणपतीची मूर्ती स्थापन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की, मूर्तीची जागा जागेवरुन हलवू नका. एकदा मूर्ती विराजमान केल्यानंतर थेट विसर्जनाच्या दिवशीच तुम्ही मूर्ती हलवू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :