Ashwini Mahangade on Amol Kolhe : राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे शिरुर मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आज एक महत्त्वाची घोषणा केली. पुढची पाच वर्ष मी मालिकांमधून ब्रेक घेत असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. पण ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या या घोषणेनंतर त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तसेच यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटात काही दिवसांपूर्वी प्रवेश केलेल्या मराठी अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. 


अभिनेत्री अश्विनी महांगडे ही काही दिवांसपूर्वी तिच्या साताऱ्यातील भाषणामुळे चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर आता तिने अमोल कोल्हेंच्या निर्णयावरही प्रतिक्रिया दिली असल्याचं पाहायला मिळतंय. शिरुर मतदारसंघ फार नशीबवान आहे, त्यांना असा माणूस म्हणून लाभलाय. पण एक कलाकार म्हणून फार वाईट वाटतंय, अशी प्रतिक्रिया अश्विनीने दिली. 


'स्वतःला वाहून घेणाराच हा माणूस'


अश्विनीने झी 24 तास सोबत संवाद साधताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने यावेळी म्हटलं की, खरंतर एक सहकलाकार म्हणून वाईटही वाटतंय. कारण आता पाच वर्ष त्यांच्यासोबत काम करता येणार नाहीये. पण एक माणूस म्हणून त्यांचं खरंच खूप कौतुक वाटतंय. एक कलाकार असून सुद्धा त्यांना कुठेतरी माहितेय की, आता मला समाजासाठी, मला सगळ्यांसाठी वेळ देणं फार गरजेचं आहे. त्यांच्या अशा विचारांचं खरंच खूप कौतुक वाटतंय. खरंच स्वतःला वाहून घेणाराच हा माणूस आहे.


'तेव्हा ते स्वतःला झोकून देतात'


पुढे अश्विनीने म्हटलं की, जेव्हा कोणतीही जबाबदारी त्यांच्यावर येते तेव्हा ते त्यामध्ये स्वतःला झोकून देतात. आताही नवं मतदारसुद्धा त्यांच्याकडे दिल्ली गेल्यानंतर हे हे प्रश्न मांडा, अशी यादी घेऊन येतात. आपण आतापर्यंत कुठे पाहिलं आहे की, नवं मतदारांनी असे प्रश्न मांडण्यासाठी खासदाराकडे किंवा उमेदवाराकडे चिठ्ठी दिलीये.  म्हणून तर आता तरुण सुद्धा खूप जागे झालेत आणि ते त्यांच्यापर्यंत सहजरित्या पोहचत आहेत. आता अमोल दादापर्यंत इतक्या सहजपणे पोहोचून प्रत्येक जण आपली मत मांडतोय. ही खरंच मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. 


ही बातमी वाचा : 


Amol Kolhe : पुढील पाच वर्षे अभिनयातून ब्रेक, अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण; 'मालिका नाही पण महानाट्य करणार'