Ashok Saraf on Ashi Hi Banwa Banwi :  मराठी सिनेसृष्टीत 80 च्या दशकात केलेली जादू ही आजही कायम आहे. त्यामुळेच 'अशी ही बनावाबनवी' (Ashi Hi Banwa Banwi) सिनेमाने इतिहास घडवला आहे, अशी प्रतिक्रिया आजही ऐकायला मिळते. या सिनेमाची गोष्ट, पात्र, त्यातील कलाकार हे आजही तितकेच किंबहुना जास्तच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. नुकतीच जवळपास 19 वर्षांनी 'नवरा माझा नवासाचा' या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. त्यानंतर अशी ही बनावबनवी या सिनेमाचा सिक्वेल होणार का? असाही प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. त्यावर आधी सचिन पिळगांवकर आणि आता अशोक सराफ यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. 


अशोक सराफांनी 'साम टिव्ही'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिनेमाच्या सिक्वेलवर भाष्य केलं आहे. या सिनेमातील काही कलाकार आता या जगात नाहीत आणि त्यांच्याशिवाय या सिनेमाचा सिक्वेल होणं निव्वळ अशक्य आहे, अशी प्रतिक्रिया सचिन पिळगांवकर यांनी दिली होती. त्यावर आता अशोक सराफांनी देखील सिनेमाचा सिक्वेल आता होणं थोडं अवघडच असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अशी ही बनवाबनवी सिनेमाचा सिक्वेल होणार नाही हे आता जवळपास निश्चित झालं आहे. 


अशोक सराफांनी काय म्हटलं?  


सिनेमाच्या सिक्वेलवर भाष्य करताना अशोक सराफांनी म्हटलं की, 'आज 35 वर्ष झाली आहेत, पण अशी ही बनवाबनवी हा सिनेमा लोकं पाहतात. या सिनेमाने एक वेगळाच इतिहास घडवला आहे. या सिनेमाच्या कंटेटमुळे हा सिनेमा आजही सातत्याने पाहिला जातो. वसंत सबनीस यांनी त्याचं लिखाण केलं होतं आणि असा लेखक आता आता होणं नाही. या सिनेमातील प्रत्येक कलाकाराचं काम हे वेगळंच होतं. पण त्याता आता रिमेक होणं थोडं कठीणच आहे. कारण सिनेमाचा सिक्वेल तितकाच चांगला असायला हवा किंवा त्यापेक्षाही जास्त चांगला असायला हवा. त्यामुळे आता थोडं कठिणच आहे.'


सचिन पिळगांवकरांनी काय म्हटलं?


सचिन यांनी म्हटले की, 'हा सिनेमा लक्ष्याशिवाय नाही बनू शकत. फक्त लक्ष्या नव्हे तर सुशांतची भूमिका साकारलेला सिद्धार्थदेखील नाही आहे. सुधीर जोशी, वसंत सबनीस, अरुण पौडवाल, शांताराम नांदगावकर असे 'अशी ही बनवाबनवी'च्या टीममधील अनेक लोक आज आपल्यात नाहीत. या सिनेमासाठी या सगळ्यांचं योगदान होतं. त्यामुळे ही मंडळीच नाहीत तर सिनेमा पुढे जाऊ शकत नाही, असे भावूक उत्तर त्यांनी दिले.' 


ही बातमी वाचा : 


Sachin Pilgaonkar On Ashi Hi Banwa Banwi -2 : 'अशी ही बनवाबनवी-2' येणार? सचिन पिळगावकर यांनी स्पष्टच सांगितले, ''हा चित्रपट...''