Ashok Saraf On Salman Khan, Shah Rukh Khan: 'पद्मश्री', 'महाराष्ट्र भूषण' पदवी मिळवलेले अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी आजवर अनेक मराठी सिनेमांसोबतच (Marathi Movies) हिंदी सिनेमांमध्येही (Hindi Movies) काम केलं. त्यातल्या काही गाजलेल्या सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे, 'करण-अर्जुन' (Karan Arjun Movie). हा सिनेमा म्हणजे, बॉलिवूडच्या (Bollywood) काही कल्ट सिनेमांपैकी एक. आता लवकरच याचा सिक्वेल येणार असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमात सलमान खान आणि शाहरुख खान ही सुपरस्टार जोडी झळकलेली. तसेच, या सिनेमात मराठमोळे अभिनेते अशोक सराफ यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना अशोक सराफ यांनी या सिनेमाच्या शुटिंग वेळी केलेल्या गमतीजमती आणि इंडस्ट्रीत नवीन असणाऱ्या शाहरुख-सलमानसोबत काम करतानाचा अनुभव सांगितला आहे. 

Continues below advertisement


राकेश रोशन दिग्दर्शित 'करण-अर्जुन' सिनेमाला मोठी पसंती मिळाली. या सिनेमात शाहरुख, सलमान यांच्यासोबत काजोल, जॉनी लिव्हर, अशोक सराफ यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट झळकलेली. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना अशोक सराफ यांनी करण-अर्जुन सिनेमाच्या शुटिंगवेळचे काही किस्से शेअर केले. 


'करण-अर्जुन'चं शुटिंग सुरू असताना शाहरुख-सलमान दिग्दर्शकाच्या रुमबाहेर फटाके वाजवायचे? 


'रेडिओ नशा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अशोक सराफ म्हणाले की, "करण अर्जुन सुपरहिट होता. मला त्या सिनेमाने खूप लोकप्रियता दिली. त्यात मी ना हिरो आहे, ना व्हिलन. माझं कॉमेडी कॅरेक्टर आहे. मी गुजराती-मारवाडी बोलतो. 'ठाकुर ते ग्यो' त्या सिनेमातला माझा हा डायलॉग खूप गाजला. साधा डायलॉग होता, पण ती बोलण्याची स्टाईल भन्नाट होती..."


'करण-अर्जुन' सिनेमाचं शुटिंग सुरू असताना शाहरुख आणि सलमान खान दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या रुमबाहेर फटाके वाजवायचे, असा किस्सा इंडस्ट्रीत चर्चेत आहे. यापूर्वी दिग्दर्शक राकेश रोशन आणि शाहरुख खान यांनीही मुलाखतीत बोलताना सांगितलं आहे. याबाबत अशोक सराफ यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, "हे खरं आहे... ते दोघंही खूप मस्ती करायचे. पण मी त्यांच्यात नसायचो. कोणाला त्रास देणं मला पटत नाही. पण ते दोघं खूपच मजा मस्ती करायचे. त्यात त्यांच्याबरोबर जॉनी लिव्हर होता. जॉनी आणि मी एकदम चांगले मित्र होतो. त्यामुळे मग मीही जॉनीबरोबर असायचो."



शाहरुख असा सहज स्टार बनलेला नाही... : अशोक सराफ 


अशोक सराफ यांनी शाहरुख खानसोबत 'येस बॉस' सिनेमातही काम केलं. त्याबाबत बोलताना अशोक सराफ म्हणाले की, "शाहरुख खान खूप मेहनती होता. तो असा सहज स्टार बनलेला नाही. त्यामागे त्याचे खरोखर खूप कष्ट आहेत. येस बॉस वेळी मी त्याला एक सजेशन दिलं होतं की, या सीनमध्ये मजा येत नाहीये. त्यावर त्याने मला लगेच रिहर्सलला नेलं होतं. जोवर परफेक्ट होत, नाही तोवर तो रिहर्सल करायचा. मला त्याचा हा स्वभाव खूप आवडतो. तो माणूसही खूप चांगला आहे."


शाहरुख-सलमान आजही भेटतात का? अशोक सराफ म्हणाले... 


शाहरुख-सलमानसोबत भेट होते का? याबाबत बोलताना अशोक सराफ म्हणाले की, "आता ते दोघंही माझ्या संपर्कात नाहीत. आमचं भेटणं होत नाही. कारण त्यांचं काम वेगळं माझं काम वेगळं. मध्यंतरी एका इव्हेंटमध्ये सलमान भेटला होता. असंच एखाद्या कार्यक्रमात भेट होते एवढंच."


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'सचिनसोबत माझी कधीच मैत्री नव्हती, त्याच्या...'; अशोक सराफ यांनी सगळंच स्पष्ट केलं