पुणे: पुण्यात एका प्रेमीयुगलाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे, हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्हीच ठरवा की याला अश्लील चाळे म्हणायचं का अती प्रेम. पुण्यातील एका प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पुण्यातील शिंदेवाडी भागातील खेड शिवापूर परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावरील असल्याचं बोललं जातं आहे. एका दुचाकीवर एक तरुणी थेट पेट्रोल टँकवर उलटी बसली आहे आणि विशेष म्हणजे दुचाकीस्वार ही दुचाकी चालवतोय. आजू बाजूच्या लोकांनी अनेक व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये काढताना त्यांना दिसत आहेत, पण दुनियाची फिकर न करता हे जोडपं त्यांच्या प्रेमात अखंड बुडालं होतं. जाणारे येणारे सर्वजण त्यांच्याकडे पहात होते, मात्र, त्यांनी त्यामध्ये सुधार केला ना त्यांनी त्यांची दुचाकी थांबवली. पुण्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. कोणी म्हणतंय की ही अश्लीलता आहे काही जणं तर हे धोकादायक पद्धतीने वाहन चालवणं आहे.

वेगाने जाणाऱ्या या दुचाकीवर एक तरुण-तरुणी अश्लील चाळे करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या जोडप्यावर कारवाई करण्याची मागणी आता नेटकरी करत आहेत. दरम्यान या तरूणीने आपलं तोंड स्कार्फने बांधलेलं आहे, तर व्हिडीओमध्ये ते दोघे एकमेकांना मिठी मारताना देखील ते दिसतात, जाणारे येणारे सर्वजण त्यांच्याकडे पाहात होते, मात्र, त्यांनी त्यामध्ये सुधार केला ना त्यांनी त्यांची दुचाकी थांबवली. पुण्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. कोणी म्हणतंय की ही अश्लीलता आहे काही जणं तर हे धोकादायक पद्धतीने वाहन चालवणं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी देखील केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईत मद्यधुंद तरुण-तरुणींचा धिंगाणा

मुंबईच्या मालाड लिंक रोडवर मध्यरात्री एका कारमध्ये तरुण आणि तरुणींनी धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुण आणि तरुणींनी कारच्या सन रुफमधून बाहेर येत मालाड लिंक रोड मीठ चौकीजवळ रस्त्यावर धिंगाणा घातला. भरधाव वेगामध्ये कार चालवून स्वतःचा जीव आणि इतरांच्या जीव धोक्यात घालून तरुणांचा धिंगाणा सुरु होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. या प्रकरणी कांदिवली वाहतूक पोलिसांच्या फिर्यादीवरून या तरुणांच्या विरोधात बांगुर नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर बांगुर नगर पोलीस धिंगाणा करणाऱ्या या तरुणांचे शोध घेत आहेत. या धिंगाणा करणाऱ्या तरुण आणि तरुणींची व्हिडिओ बनवणाऱ्या कार चालकांनी हे दारूचे नशेत धिंगाणा करत असल्याचा आरोप केला आहे.