Aruna Irani has fought breast cancer : दिग्गज अभिनेत्री अरुणा ईराणी यांचा बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातील अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात घरं करुन आहे.. मात्र, त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत खासगी आणि गंभीर बाब अनेकांना माहिती नाही. नुकत्याच एका मुलाखतीत अरुणा ईराणी यांनी खुलासा केला की त्यांना केवळ एकदा नव्हे तर दोन वेळा स्तनाच्या कर्करोगाचा (ब्रेस्ट कॅन्सर) सामना करावा लागला होता. (Aruna Irani has fought breast cancer) त्यांनी या प्राणघातक आजाराशी केलेल्या लढ्याबद्दल सांगितले आणि कशा पद्धतीने त्यांनी दोन्ही वेळा हा आजार मात करून जिंकला, हे उलगडलं. (Aruna Irani has fought breast cancer)

पहिल्यांदा अरुणा इराणी यांनी केलं होतं दुर्लक्ष!

‘लेहरन रेट्रो’ या कार्यक्रमाशी बोलताना अरुणा ईराणी यांनी उघड केलं की त्यांना दोन वेळा ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. दोन्ही वेळा त्यांनी कोणालाही न सांगता, एकांतात ही लढाई लढण्याचा निर्णय घेतला. हा खुलासा त्यांच्या अनेक चाहत्यांसाठी धक्कादायक होता, कारण गेली सात दशके त्या चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. 2015 साली त्यांना प्रथम कॅन्सर झाल्याचं निदान झालं. त्यांनी सांगितलं की सुरुवातीला डॉक्टरांनी त्या गाठीकडे दुर्लक्ष केलं, आणि ती सामान्य असल्याचं समजून दुर्लक्ष केलं. पण त्यांच्या मनाने सतत काहीतरी वेगळं सांगत होतं. शेवटी त्यांनी ठामपणे सांगितलं की गाठ तात्काळ काढून टाकली पाहिजे.

डॉक्टरांनी त्यावेळी केमोथेरपीची शिफारस केली होती. मात्र, अरुणा ईराणी यांनी त्या वेळी उपचार घेण्यास नकार दिला कारण त्यांना वाटत होतं की केमोमुळे केस गळतील, त्वचेवर परिणाम होईल आणि त्यामुळे त्यांचं काम बिघडू शकतं. म्हणून त्यांनी औषधाच्या गोळीने उपचार घेणं पसंत केलं.

2020 मध्ये पुन्हा कर्करोग

पहिल्यांदा केमोथेरपी न घेता इतर पर्याय यशस्वी ठरला होता, पण दुर्दैवाने 2020 मध्ये, कोविड-19 महामारी सुरू होण्याच्या काही आधीच त्यांना पुन्हा एकदा हा आजार झाल्याचं समजलं. या वेळी त्यांनी मागच्या वेळच्या निर्णयाला ‘चूक’ म्हणत यावेळी केमोथेरपीचा मार्ग स्वीकारला. त्यांनी सांगितलं, “ही माझी चूक होती, कारण मी पहिल्यांदा केमोथेरपी घेतली नव्हती. यावेळी मात्र मी ती घेतली.”

अरुणा ईराणी यांनी असंही सांगितलं की केमोथेरपीमुळे केस तात्पुरते गळले, पण आधुनिक उपचारपद्धतीमुळे केस लवकर परत आले. केस गळण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं, “हो, तुमचे केस काहीसे गळतात, पण ते लवकर परत येतात.” या सगळ्या अनुभवातून अरुणा ईराणी यांनी दाखवलेली लढवय्या वृत्ती आणि सकारात्मकता अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

सैराटमधील 'सल्ल्या'ची गर्लफ्रेंड कोण? लग्नही करणार? फोटो व्हायरल!

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू पापाराझींवर भडकली, म्हणाली 'थांबवा हे सगळं' VIDEO