Beed News: बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकळण्यात आली आहे .बीड येथील विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्यामुळे आज ( 16 जून) रोजी होणारी सुनावणी आता 24 जून रोजी होणार आहे .की सुनावणी विशेष मकोका न्यायालयात पार पडणार होती . वाल्मिक कराडच्या आरोप निश्चितीबाबत आज युक्तिवाद होण्याची शक्यता होती . दरम्यान आजच्या सुनावणीत काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होणार होते .मात्र न्यायाधीशांचा अनुपस्थितीमुळे सर्व कारवाई पुढे ढकलण्यात आली असून पुढची तारीख देण्यात आली आहे .
वाल्मिक कराडच्या आरोप निश्चितीचा युक्तीवाद
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता . या प्रकरणात वाल्मीक कराडसह इतर आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली . या घटनेतील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे . गेल्या सुनावणीत देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चिती बाबत पुरेसे पुरावे असून आरोप निश्चिती करून घ्यावी, असा अर्ज उज्वल निकम यांनी न्यायालयाला सादर केला होता. तर वाल्मीक कराडच्या वकीलांकडून अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचं म्हणणे मांडण्यात आलं. तर वाल्मिक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्ज न्यायालयात प्रस्तावित केला आहे.
या प्रकरणाची मागील सुनावणी 3 जून रोजी पार पडली .या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्वल निकम यांची उपस्थिती ही होती . मागच्या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराडच्या आरोप निश्चितीबाबत महत्त्वाचा युक्तिवाद करण्यात आला होता .आरोपीच्या वकिलांना डिजिटल एव्हिडन्स प्राप्त व्हावेत यासाठी वाल्मिक कराडच्या वकिलांकडून मागणी करण्यात आली होती .याच मुद्द्यावरून आज पुन्हा युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता होती .मात्र विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे .
संतोष देशमुख यांचा मुलगा सैनिकी शाळेत घेणार शिक्षण
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांना भेटण्यासाठी गेले असता, त्यांनी विराज देशमुखच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. त्यानुसार आता विराज देशमुख हा सांगली जिल्ह्यातील रेठेधरण येथील सैनिकी शाळेमध्ये शिक्षण घेणार आहे.याबाबतचे पत्र वर्षा निवासस्थानी झालेल्या महेश सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना सुपूर्द करण्यात आलेय. यावेळी औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार तसेच आमदार सदाभाऊ खोत यांची देखील उपस्थिती होती.
हेही वाचा