एकिकडे लॉकडाऊनमुळे सामान्य जनांची ताटातूट होत असली तरी याच शांततेमध्ये आता सनई चौघड्यांचे सूर ऐकू आले आहेत. हे सूरही आहेत थेट दगडी चाळीतून. कारण आज अरूण गवळी यांची कन्या योगिता हिचा विवाह दादा कोंडके यांच्या बहिणीचा नातू असलेल्या अभिनेता अक्षय वाघमारे याच्यासोबत झाला आहे. योगिता ही सिनेनिर्माती असून तिने दगडी चाळ या सिनेमाची निर्मिती केली आहे. शिवाय ती एक स्वयंसेवी संस्थाही चालवते. तर अक्षय यापूर्वी दोस्तीगिरी, यूथ या सिनेमांसह ती फुलराणी या मालिकेतही झळकला होता.
अक्षय मूळचा पुण्याचा. अर्थात आताही तो पुण्यातच वास्तव्याला आहे. त्यामुळे आता योगिता पुण्याची सून होणार आहे. याबाबत बोलताना अक्षयने आपली लव्हस्टोरीच एबीपी माझाला सांगितली. तो म्हणाला, 'योगिता आणि मी एकमेकांना अनेक वर्षं ओळखतो. आम्ही चांगले मित्रही आहोत. त्यामुळे बोलणं व्हायचं. त्यातून मग अनेक मानसिक चढउतारांमध्ये आम्ही एकमेकांना साथ दिली. त्यातूनच एकत्र का राहू नये असा विचार आला. मग रीतसर मी माझ्या घरी सांगितलं. तिनेही तिच्या घरी कळवलं आणि मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला'.
Lockdwon | बिग बॉस 2 विनर आशुतोष कौशिक विवाहबंधनात; लॉकडाऊनमुळे घराच्या गच्चीवर घेतली सप्तपदी
अत्यंत मोजक्या लोकांमध्ये दगडी चाळीत हा विवाह पार पडला. मिळालेल्या माहीतीनुसार स्वत: अरूण गवळीही या विवाहाला उपस्थित असल्याची माहिती आहे. या लग्नासाठी पोलिसांची परवानगी काढून अक्षय गुरूवारीच मुंबईत दाखल झाला. मेंदी आणि हळदी समारंभ झाल्यानंतर आज दुपारी त्यांचा विवाह दगडी चाळीत झाला. योगिता हिचा विवाह यापूर्वी कोल्हापुरातील एका तरूणाशी ठरला होता. पण साखरपुडा झाल्यानंतर काही कारणाने तो विवाह स्थगित करण्यात आला. त्यानंतर दोन वर्षांनी अक्षय आणि योगिताने लग्नाचा निर्णय घेतला.
#Corona | देशभरात 24 तासात 3390 नवे कोरोनाचे रुग्ण, 37,916 अॅक्टिव्ह रुग्ण, आतापर्यंत 16,540 रुग्ण बरे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती