Jaun Elia Birth Anniversary: ''होय, मी अमरोहाचा (उत्तर प्रदेश) आहे, भारताचा आहे आणि नेहमीच भारताचाच राहिलो. मलिकजादा मंजूर अहमद यांना माहीत आहे की, मी पाकिस्तानातून भारतात आलो तेव्हा अमरोहाला पोहोचल्यानंतर त्या जमिनीवर डोकं टेकवून, त्या मातीतच झोपलो. मी भारताचा होऊ शकलो असतो आणि होऊ शकतो. देशाचे दोन तुकडे झाले आहेत, यावर बरेच दिवस माझा विश्वास बसत नव्हता. मी या फाळणीच्या विरोधात होतो. अशा प्रकारच्या विभाजनाला माझा विरोध होता. पण मला जावं लागलं. पुन्हा यायचे होते पण येऊ शकलो नाही'', हे शब्द आहेत भारतात जन्मलेल्या आणि पाकिस्तानात मृत्यू झालेले प्रसिद्ध शायर जॉन एलिया (Jaun Elia) यांचे. जॉन हयात असताना जितके आपल्या शायरीसाठी प्रसिद्ध होते, तितकेच ते आजही आहेत. आज गुगलवर सर्वाधिक सर्च केलं जाणाऱ्या शायरांपैकी ते एक आहेत. आजच्या तरुणांमध्ये जॉन हे खूपच लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेत. उर्दूच्या अनेक बड्या शायरांचं म्हणणं आहे की, लोक आज जितकं 'मिर्झा गालिब' (Mirza Ghalib) यांना वाचतात, तितकेच ते जॉन एलिया (Jaun Elia) यांनाही वाचतात.


अब हमारा मकान  किस  का  है 
हम तो अपने मकाँ के थे ही नहीं 


जॉन (Jaun Elia) यांची ओळख पाकिस्तानी शायरची आहे. मात्र त्यांचा जन्म भारतात झाला होता. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात 14 डिसेंबर 1931 रोजी त्यांचा जन्म झाला पाकिस्तानमध्ये राहत असताना 8 डिसेंबर 2002 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचे जीवन हे त्याच्या चाहत्यांसाठी एक संपूर्ण पुस्तक असतं. आज जॉन (Jaun Elia) आपल्यात नसताना त्यांच्या शायरी आणि गझल व्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील किस्सेही मोठ्या आपुलकीने चाहते ऐकतात. असाच एक किस्सा जॉन त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने पत्रकार आणि गीतकार निलेश मिश्रा यांच्याशी बोलताना सांगितलं होता. स्वातंत्र्याच्या सोळा वर्षांपूर्वी जन्मलेल्या जॉनबद्दल (Jaun Elia) असे म्हटले जाते की, त्याला सुरुवातीपासूनच दोन गोष्टी अतिशय आकर्षक वाटत होत्या. त्या काळात स्वातंत्र्यलढा सुरू असल्याने अनेक तरुण देशासाठी आपले प्राण देण्यासही तयार होते.  त्यामुळे त्यांचा पहिला छंद होता तो तरुणपणीच मरण्याचा. 


दुसरा छंद जो त्यांना होता तो म्हणजे रक्त थुंकण्याचा! होय रक्त थुंकण्याचाच. जॉन एलिया (Jaun Elia) यांच्याबद्दल असं म्हटलं जात की, हा शायर रक्त थुंकतो. त्यांनी आपल्या अनेक गजल आणि शायरीमध्ये रक्त थुंकण्याबद्दल लिहिलं आहे. त्यांना टीबीचा आजार होता. 


मेरे हुजरे का क्या बयां कि यहां
ख़ून  थूका  गया  शरारत  में


रंग हर रंग में है  दाद  तलब 
ख़ून थूकूं तो वाह वाह कीजे


आज जॉन (Jaun Elia) यांच्या जन्मदिनी त्यांचे अनेक चाहते सोशल मीडियावर त्यांची आठवण काढत, त्यांची शायरी पोस्ट करत आहेत. मात्र जॉन यांनीही स्वतःला जन्मदिनाच्या शुभेच्छा आपल्याच एका शायरीतून दिल्या आहेत...


क्या कहा आज जन्मदिन है मेरा,
जौन तो यार मर गया कब का.


जॉन यांचे काही शेर 


जो गुज़ारी न जा सकी हम से 
हम ने वो ज़िंदगी गुज़ारी है 


मैं  भी  बहुत अ जीब  हूँ  इतना  अजीब  हूँ  कि  बस 
ख़ुद को तबाह कर लिया और मलाल (पश्चात्ताप) भी नहीं 


बहुत  नज़दीक  आती जा  रही  हो 
बिछड़ने का इरादा कर लिया क्या


कौन इस घर की देख-भाल करे 
रोज़  इक  चीज़  टूट  जाती  है 


कितनी दिलकश हो तुम कितना दिल-जू हूँ मैं 
क्या  सितम है  कि  हम  लोग  मर  जाएँगे